Agriculture Business : बायोफ्लॉक तंत्रज्ञानाद्वारे मासे पालन करा; कमी खर्चात लाखोंचे उत्पादन मिळवा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांना (Agriculture Business) त्यांच्या पिकांना योग्य दर मिळत नाही. पिकाचा उत्पादन खर्च अधिक आणि त्यातून उत्पन्न कमी, अशी शेतकऱ्यांची करूण कहाणी असल्याने सध्या अनेक शेतकरी जोडधंदा करण्यास प्राधान्य देत आहे. शेतीनंतर डेअरी हा दुसऱ्या क्रमांकाचा महत्वाचा व्यवसाय आहे. मात्र, त्यातही दुधाचे दर कमी जास्त होत असल्यामुळे अनेक शेतकरी मासे पालन व्यवसायाकडे वळत आहेत. विशेष म्हणजे या व्यवसायात उत्पादन खर्चाच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अगदी काही हजार रुपये भांडवलात बायोफ्लॉक पद्धतीने मासे पालन व्यवसाय (Agriculture Business) कसा सुरु करायचा? याबाबत थोडक्यात सांगणार आहोत.

काय आहे बायोफ्लॉक तंत्रज्ञान? (Agriculture Business Fish Farming)

बायोफ्लॉक तंत्रज्ञानामध्ये बायोफ्लोक नावाच्या जिवाणूचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानामध्ये सर्वप्रथम मासे एका सिमेंट किंवा प्लास्टिकच्या छोट्या टाक्यांमध्ये टाकले जातात. या टाक्यांमध्ये त्या माशांना पाळले जाऊन, त्यांना तिथेच खायला टाकले जाते. माशांनी खालेल्या एकूण खाद्यापैकी मासे 75 टक्के खाद्य या टाकीमध्येच आपल्या मलविसर्जन स्वरूपात बाहेर टाकतात. त्यानंतर खरे या तंत्रज्ञानाचे काम सुरु होते. तुम्ही वापरणार असलेला बायोफ्लोक नावाचा जिवाणू हा माशांच्या विसर्जित मलास पुन्हा प्रोटीनयुक्त खाद्यात रूपांतरित करतो. अर्थात माशांनी हे त्यांचे बायोफ्लॉकयुक्त मल पुन्हा खाल्ल्यास सामान्य खाद्याच्या तुलनेत माशांची वाढ तीव्र गतीने होते.

काय आहेत या तंत्रज्ञानाचे फायदे?

  • बायोफ्लॉक तंत्रज्ञानाच्या मदतीने मासे पालन व्यवसाय (Agriculture Business) केल्यास कमी खर्चात, कमी जागेत अधिक उत्पन्न मिळवता येते.
  • चार महिन्यातून केवळ एकदा टाकीतील पाणी बदलावे लागते.
  • बाहेरची काही घाण जमा झाल्यास केवळ 10 टक्के पाणी टाकीतून काढून साफ केली जाऊ शकते.
  • तुमच्या वापरात नसलेल्या जागेत आणि कमी पाण्यातही या पद्धतीने मासेपालन करता येते.
  • विशेष म्हणजे या व्यवसायासाठी तुम्हाला खूप साऱ्या मजुरांची गरज नसते.

शेतकरी आपल्याकडील कमी जागेत प्लास्टिक टाक्यांचा वापर करून या पद्धतीने मासे पालन व्यवसाय करू शकतात. या पद्धतीने शेतकऱ्यांनी मासे पालन व्यवसाय करणे सुरु केल्यास त्यांना त्यातून लाखोंचे उत्पन्न मिळू शकते. मासे पालन करण्याची ही पद्धती सर्वात सोपी, कमी खर्चिक आणि अधिक नफा मिळवून देणारी आहे. ज्यामध्ये तुम्हाला अधिक भांडवलाची गुंतवणूक करण्याची आवशक्यता नसते.

error: Content is protected !!