Agriculture Business : मासेपालन, बदकपालन व्यवसाय करेल लखपती; असे करा एकत्रित नियोजन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात शेतकरी शेतीसोबतच अनेक जोडधंदे (Agriculture Business) करत मोठी आर्थिक कमाई करत असतात. यात प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय दुसऱ्या स्थानी असून, अनेक भागांमध्ये मोठ्या शेततळ्यांमध्ये शेतकऱ्यांकडून मासेपालन केले जाते. विशेष म्हणजे राज्य सरकारकडून देखील शेतकऱ्यांना वेळोवेळी मासेपालनासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. ज्यामुळे सध्या अनेक शेतकरी मासेपालन व्यवसायाकडे वळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण मासेपालन आणि बदकपालन एकत्रिपणे कसे करायचे? याबाबतचे तंत्र जाणून घेणार आहोत. या तंत्रामुळे मासेपालन व्यवसायातील (Agriculture Business) तुमचे कष्ट कमी होण्यास मदत होणार आहे.

दोन्ही व्यवसाय एकत्रित का? (Agriculture Business For Farmers)

मासेपालन आणि बदकपालन एकत्रिपणे का करायचे? तर मासे ज्याप्रमाणे पाण्यात राहतात. अगदी त्याच पद्धतीने बदकाला देखील पाण्यास राहण्यास आवडते. ज्यामुळे एकाच तळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मासेपालन आणि बदकपालन (Agriculture Business) करणे शक्य होणार आहे. ज्यामुळे तुमचा दोन्ही व्यवसाय करताना उत्पादन खर्च कमी राहून त्यातून तुम्हाला दुप्पट नफा मिळण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे बदकपालन केल्याने शेततळयाची शेवाळ किंवा अन्य बाबतीत देखील साफसफाई होते. ज्यामुळे माशांना देखील स्वच्छ ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. त्यातून त्यांची पटकन वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे शेतकरी मासेपालन आणि बदकपालन एकत्रितपणे करून मोठी कमाई करू शकतात.

उत्पादन खर्चात होईल बचत

कृषी व्यवसाय क्षेत्रातील जाणकारांच्या मते, मासेपालन आणि बदकपालन एकत्रितपणे केल्यास, माशांच्या खाद्यासाठी 75 टक्के खर्च कमी होतो. याशिवाय बदक पालनादरम्यान बदकांच्या आहारावर होणारा खर्च देखील जवळपास 30 ते 35 टक्के इतका कमी होतो. याशिवाय शेततळे एकच असल्याने तो खर्च देखील कमी होतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना या दोन्ही व्यवसायांची सांगड घालून दुप्पट नफा कमावता येऊ शकतो.

कसे कराल बदकपालन?

साधारणपणे एक बदक जन्मल्यानंतर 24 आठवड्यानंतर अंडी देण्यास सुरुवात करते. त्यानंतर जवळपास 2 वर्ष ही प्रक्रिया सुरु राहते. त्यामुळे तुम्ही एका तळ्यात जवळपास 250 ते 300 बदक सहजपणे पाळू शकतात. तळ्यामध्ये मासेपालन करताना शेतकऱ्यांनी माशांच्या छोटे बीज न टाकता, त्याऐवजी आकाराने मोठे असलेले 4 ते 5 हजार फिंगरलिंग टाकले पाहिजे. त्यानंतर माशांना पाण्यामध्ये खाण्यासाठी धानाचे भूस, ढेप, मिनरल मिक्चर टाकले पाहिजे. ज्यामुळे 6 ते 9 महिन्याच्या कालावधीमध्ये एक मासा एक किलोपर्यंत वाढण्यास मदत होते.

किती मिळते उत्पन्न?

जर तुम्ही एक एकराच्या तळ्यात मासेपालन आणि बदकपालन एकत्रिपणे करत असाल तर तुम्हाला त्यातून 18 ते 20 क्विंटलहुन अधिक माशांचे उत्पादन मिळू शकते. तर बदक पालन करताना तुम्ही बदकांना खाद्य म्हणून बरसीमचे गवत, ओट्स, पालेभाज्या, भाताचे भुस, खनिज मिश्रण आणि बाजारात तयार खाद्य देऊ शकता. साधारणपणे चार ते साडेचार महिन्यात बदक अंडी देण्यास सुरुवात करते. ज्यामुळे तुम्ही एकत्रिपणे मासेपालन आणि बदकपालन करून 5 ते 6 लाखांची कमाई सहज करू शकतात.

error: Content is protected !!