Agriculture Business : शेतकऱ्यांनो… सुरु करा हा व्यवसाय; कमी गुंतवणुकीत मिळेल अधिक नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी शेतात नगदी पिके घेतात. मात्र त्यांना त्यातून उत्पादन खर्च (Agriculture Business) अधिक करूनही कमी नफा मिळतो. काही वेळा तर तो खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे. मात्र, शेतीमध्ये असे काही व्यवसाय शेतकरी करू शकतात. त्यातून त्यांना लाखोंची कमाई होऊ शकते. आज आपण फ्रोझन पीस व्यवसायाबद्दल (Agriculture Business) जाणून घेणार आहोत.

विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या घरातील एका छोट्या खोलीतून गोठवलेल्या वाटाण्याचा व्यवसाय (Agriculture Business) सुरू करू शकतात. मात्र, मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा असेल तर 4 हजार ते 5 हजार चौरस फूट जागा आवश्यक आहे. त्याच वेळी, लहान प्रमाणात व्यवसाय सुरू करताना हिरवे वाटाणे सोलण्यासाठी काही मजुरांची आवश्यकता असेल. मोठ्या प्रमाणावर तुम्हाला वाटाणा सोलण्याची मशीनची आवश्यकता असेल. याशिवाय तुम्हाला या व्यवसायासाठी परवाना देखील आवश्यक असणार आहे.

कसा सुरु कराल ‘हा’ व्यवसाय? (Agriculture Business Frozen Matar)

गोठवलेल्या वाटाण्याचा व्यवसाय (Agriculture Business) सुरू करायचा असेल तर हिवाळ्यात शेतकऱ्यांकडून हिरवे वाटाणे खरेदी करावे लागतात. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यापर्यंत ताजे हिरवे वाटाणे सहज उपलब्ध होतात. तुम्ही तुमच्या घरातील एका छोट्या खोलीतून गोठवलेल्या वाटाण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात. शेतकऱ्यांकडून वाटाणे खरेदी केल्यानंतर तुम्हाला सोलणे, धुणे, उकळणे आणि पॅकिंग इत्यादीसाठी मजुरांची आवश्यकता असेल. सर्व वाटाणे एकाच वेळी विकत घ्यावे लागतील असे नाही. आपण दररोज वाटाणा खरेदी करून त्यावर प्रक्रिया करू शकतात.

किती मिळेल आर्थिक नफा?

फ्रोझन मटारचा व्यवसाय सुरू केल्यास किमान 50-80 टक्के नफा मिळू शकतो. हिरवा वाटाणा शेतकऱ्यांकडून १० रुपये किलो या दराने खरेदी करता येतो. यामध्ये दोन किलो मटारमध्ये सुमारे 1 किलो धान्य बाहेर येते. जर तुम्हाला मटारची किंमत बाजारात 20 रुपये किलोवरून मिळत असेल. तर तुम्ही या वाटाण्यांवर प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणात 120 रुपये किलो दराने विकू शकतात. दुसरीकडे, जर तुम्ही फ्रोझन मटारची पाकिटे थेट किरकोळ दुकानदारांना विकली तर तुम्हाला जास्त फायदा मिळवता येऊ शकतो.

कसे बनवायचे गोठलेले वाटाणे?

फ्रोझन मटार बनवण्यासाठी, वाटाणा प्रथम सोलले जातात. यानंतर वाटाणा सुमारे 90 अंश सेंटीग्रेड तापमानात उकळले जातात. नंतर मटारचे दाणे 3-5 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत थंड पाण्यात टाकले जातात. जेणेकरून त्यातील जिवाणू नष्ट होतात. यानंतर पुढील काम हे वाटाणा 40 अंशांपर्यंत तापमानात ठेवणे आहे. जेणेकरून मटारमध्ये बर्फ गोठतो. मग वाटाणा वेगवेगळ्या वजनाच्या पॅकेटमध्ये पॅक करून बाजारात पोहोचवले जातात.

error: Content is protected !!