Agriculture Business : औषधी वनस्पतींची लागवड; शेतकऱ्याने उभारली 10 कोटीची कंपनी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी सध्या शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग (Agriculture Business) करताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक शेतकरी राज्यात विदेशी फळे व भाजीपाल्याची शेती करत आहे. तर काही शेतकरी पारंपारिक पिकांना बगल देत, वनोऔषधी वनस्पतींच्या लागवडीकडे वळत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना या पिकांमधुन अधिकचा नफा देखील मिळत आहे. आज आपण अशाच औषधी वनस्पतींची शेती करणाऱ्या आणि त्यातून 10 कोटींची कंपनी उभी करणाऱ्या शेतकऱ्याच्या व्यवसायाबद्दल (Agriculture Business) जाणून घेणार आहोत.

शिक्षणाचा वापर शेतीमध्ये (Agriculture Business Herbal Farming Company)

राकेश असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील राजपुरा गावचे रहिवासी आहेत. 43 वर्षीय राकेश यांनी बीएससीपर्यंत शिक्षण घेतले आहे. मात्र, आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राकेश यांनी नोकरीच्या मागे न पळता, शेतीमध्ये आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. शेती करताना आपल्या ज्ञानाचा त्यांना खूप फायदा झाल्याचे ते सांगतात. 2003 मध्ये 20 वर्षांपूर्वी राकेशने राज्य सरकारच्या वनोऔषधी मंडळाच्या माध्यमातून अनुदान मिळवत, आपल्या शेतीमध्ये वनोऔषधी वनस्पतींची (Agriculture Business) लागवड करणे सुरु केले.

उभारली ‘विनायक हर्बल’ नावाने कंपनी

गेली अनेक वर्ष आपल्या शेतीमध्ये उत्पादित उत्पादने (Agriculture Business) ते अन्य कंपन्यांना विक्री करत होते. मात्र, अनेक वर्ष कठीण परिस्थितीचा सामना केल्यानंतर 2017 मध्ये राकेश यांनी ‘विनायक हर्बल’ नावाने आपल्या कंपनीची स्थापना केली. औषधी वनस्पतींच्या लागवडीनंतर राकेश यांनी आपल्याकडे उत्पादित मालासह 50 हजार शेतकऱ्यांना आपल्यासोबत जोडले आहे. या शेतकऱ्यांकडे उत्पादित वनोऔषधी वनस्पतींच्या माध्यमातून त्यांनी आज 10 कोटींची कंपनी उभारली आहे. राकेश यांच्यामुळे आज अनेक युवकांना रोजगार मिळण्यासह, अनेक शेतकऱ्यांना देखील वनोऔषधी वनस्पतींच्या लागवडीतून आर्थिक फायदा होत आहे.

समजून घेतले शेतीतील बारकावे

राकेश सांगतात, आपण शेतीमध्ये पाऊल ठेवण्याआधी त्यातील काही बारकावे समजून घेतले. ज्यात हवामान बदलानुसार उच्च गुणवत्तेचे पीक घेण्यावर भर दिला. तसेच बाजारभावाच्या मागणीनुसार आपण वनोऔषधी वनस्पतींच्या लागवडीवर भर दिला. प्रथमतः आपल्याला घरातूनच विरोध झाला. मात्र, आपण धीराने फार्मा कंपन्यांसोबत संबंध ठेवत आणि स्थानिक डीलर्ससोबत सलोख्याचे संबंध निर्माण करत आपली उत्पादने विक्री केली. ज्यामुळे आपण 20 वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले आहे. त्यांच्या औषधी वनस्पतीच्या शेतीनंतर, कंपनी स्थापन केल्यानंतर ते तरुणांसाठी प्रेरणादयी ठरले आहे.

error: Content is protected !!