Agriculture Business : मका भुसापासून करतोय लाखोंची उलाढाल; सरकारने दिलंय व्यवसायाचे पेटंट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मकाचे उत्पादन (Agriculture Business) घेतले जाते. मका या पिकाला हमीभाव आधीच ठरलेला असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यातून निश्चित असा आर्थिक फायदा होतो. याशिवाय जनावरांना चारा देखील मिळतो. मकाचे भूस दुधाळ जनावरांसाठी अत्यंत उपयोगी मानले जाते. मात्र, आता एका इंजिनिअर तरुणाने याच मकाच्या भुसापासून रोजच्या वापरातील विविध वस्तू बनवण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. ज्यातून त्याला वार्षिक मोठी कमाई होत आहे. इतकेच नाही तर मकाच्या भुसापासून रोजच्या वापरातील वस्तू बनवण्याच्या त्याच्या व्यवसायाला (Agriculture Business) पुढील 20 वर्षांसाठी केंद्र सरकारकडून पेटंट देखील देण्यात आले आहे.

कशी सुचली कल्पना? (Agriculture Business Maize Products)

मोहम्मद नाज ओजैर असे या तरुणाचे नाव असून, तो बिहारच्या मुजफ्फरपुर जिल्ह्यातील मुरादपुर गावचा रहिवासी आहे. 2019 पासून अर्थात मागील पाच वर्षांपासून तो या व्यवसायात (Agriculture Business) स्थिरावला आहे. मोहम्मद याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून, तो हैद्राबाद येथील इंजीनियरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी करत होता. मात्र नोकरीत मन रमत नसल्याने, त्याने काहीतरी शेती आधारित उद्योगात येण्याचा ध्यास मनी बाळगला. त्यातून त्याला मकाच्या भुसापासून रोजच्या वापरातील वस्तू बनवण्याची कल्पना सुचली. त्याची एक कल्पना आणि आज त्याला पुढील 20 वर्षांसाठी मकाच्या भुसापासून विविध वस्तू बनवण्याचे पेटंट सरकारकडून मिळाले आहे.

कोणत्या वस्तू बनवतो?

मोहम्मद नाज ओजैर सांगतो, “आपण मकाच्या भुसापासून रोजच्या वापरातील हॅन्ड बॅगसह अनेक वस्तू बनवतो. याशिवाय लग्न समारंभांमध्ये लागणार द्रोण, जेवणाच्या प्लेट, ग्लास, चहाचे सिंगल युझ कप देखील बनवतो. याशिवाय विविध साबण कंपन्यांसोबत आपण टायअप केले असून, त्यांना साबण पँकिंगसाठी लागणारे पाऊच आणि आतला पांढरा कागद देखील आपण बनवतो. ज्यातून आपल्याला सध्या लाखोंची कमाई होत आहे. केंद्र सरकारकडून आपल्याला आपल्या या सर्व वस्तूंना पेटंट दिले गेले आहे. ज्यामुळे आपल्या वार्षिक कमाईमध्ये आणखी वाढ होण्यास मदत झाली आहे.

व्यवसायाचा आणखी विस्तार करणार

मोहम्मद नाज ओजैर सांगतो, आपण जेव्हा 2019 मध्ये नोकरी सोडून या व्यवसायात पाय ठेवला. तेव्हा आपल्या गावातील काही लोकांनी आपल्याला वेडे ठरवले. मात्र, आपल्या व्यवसायाला सरकारने पेटंट दिल्याने लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. आपण यापूर्वी पपई, केळी, बांबूपासून वस्तू बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश मिळाले नाही. मकापासून वस्तू बनवण्यात आपल्याला यश आले असून, सरकारने देखील त्यास पुढील 20 वर्षांसाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात या व्यवसायाचा आपण आणखी विस्तार करणार आहे. असेही त्याने शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!