हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात शेतकरी मशरूम शेती व्यवसायाकडे (Agriculture Business) वळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या शेतीचे तंत्र समजून घेतल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळवला जाऊ शकतो. अलीकडेच राज्यातील अनेक भागात काही शेतकऱ्यांनी झोपडी उभारून त्यात मशरुम शेती यशस्वी करून दाखवल्याचे समोर आले होते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेतकऱ्याच्या मशरूम शेतीबद्दल सांगणार आहोत. ज्याने केवळ 36 रुपये इतक्या नाममात्र खर्चात मशरूम शेती करणे सुरु केले होते. मात्र, हाच शेतकरी आज मशरूम शेतीतून कोट्यवधी रुपये कमावत आहे. आज आपण या शेतकऱ्याच्या मशरूम शेतीच्या व्यवसायाबद्दल (Agriculture Business) जाणून घेणार आहोत.
केवळ 36 रुपये भांडवल (Agriculture Business Mashroom Farming)
संतोष मिश्रा असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते ओडिसा राज्यातील दंडमुकुंद पुर गावचे रहिवासी आहेत. त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. हलाखीची परिस्थिती असल्याने त्यांना पुढील शिक्षण पूर्ण करता आले नाही. मात्र, म्हणतात ना एखाद्या व्यक्तीमध्ये इच्छाशक्ती असेल तर तो खडकातूनही पाणी बाहेर काढू शकतो. त्यांचे शिक्षण झालेले असल्याने, काहीतरी नवीन करून दाखवण्याची प्रबळ इच्छाशती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अशातच त्यांनी 1989 मध्ये भूवनेश्वर (ओडिसा) येथील कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातून मशरूम शेती व्यवसायाचे प्रशिक्षण (Agriculture Business) घेतले. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांच्याकडे केवळ 36 रुपये इतके भांडवल उपलब्ध होते. मात्र आज ते ओडिसातील पिपली येथील भव्य ‘कलिंगा मशरूम सेंटर’चे मालक आहेत.
1990 च्या दशकात पुरस्कार
संतोष यांनी आपल्या वडिलांकडून तसेच स्वतःकडील काही पैसे अशी जुळवाजुळव करून एका शेडमध्ये 100 लाद्यांवर 1989 साली मशरूम शेती करणे सुरु केले होते. पहिल्याच वर्षी त्यांना 150 किलोग्रॅम इतके मशरूम उत्पादन मिळाले होते. त्यानंतर त्यांनी त्या काळी 60,000 रुपये कर्ज घेऊन, 3000 लाद्यांवर मशरूम व्यवसाय करणे सुरु केले. त्यातून त्यांना त्या काळी दिवसाला 2550 रुपये कमाई सुरु झाली. त्यांचे हेच यश पाहून 1990 च्या दशकात त्यांना मशरूम शेतीसाठीचा ‘मशरूम करोड़पती’ हा पुरस्कार देखील मिळाला होता.
वार्षिक 10 लाखांची कमाई
1990 च्या दशकात सुरु झालेल्या संतोष मिश्रा यांचा मशरूम शेती व्यवसाय आज मोठ्या प्रमाणात विस्तारला असून, त्यांनी भव्य असा मशरूम फार्म उभाराला आहे. ज्यातून ते प्रतिदिन दोन हजार गोणी इतका मोठ्या प्रमाणात मशरूम उत्पादित करतात. याशिवाय त्यांनी ‘कलिंगा मशरूम सेंटर’ देखील उभारले आहे. सध्या त्यांना आपल्या या मशरूम व्यवसायातून वार्षिक 10 लाखांचा निव्वळ नफा होत असल्याचे ते सांगतात. याशिवाय ते आपल्या मशरूम शेतीव्यतिरिक्त, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग कार्यक्रम देखील राबवतात. ज्याद्वारे त्यांनी आतापर्यंत एकूण एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले आहे.