Agriculture Business : सेंद्रिय भाजीपाला लागवड; अशिक्षित महिलेची शेतीतून 6 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती म्हटले की आतबट्ट्याचा धंदा (Agriculture Business) असे आपण नेहमीच सर्रासपणे ऐकतो. मात्र, याच शेतीला पाणी, बाजारभाव, पिकांचे योग्य नियोजन आणि कष्टाची जोड मिळाली. की मग त्यातून भरभराट होण्यास सुरुवात होते. मात्र त्यासाठी या सर्व गोष्टी एकत्रिपणे जुळून येणे आवश्यक असते. अशातच आता शेतीमध्ये सेंद्रिय पिकांच्या लागवडीकडे वळलेल्या एका शेतकरी जोडप्याच्या शेती व्यवसायातील यशाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे पती केवळ 10 वी पास तर पत्नी अशिक्षित असलेल्या या जोडप्याने कष्टाच्या मदतीने सेंद्रिय शेतीतून (Agriculture Business) नंदनवन फुलवले आहे.

शेतीमध्ये पतीचीही साथ (Agriculture Business Of Organic Vegetable Farming)

शेतकरी रमेश मौर्या आणि त्यांची पत्नी किरण मौर्या या उत्तरप्रदेशातील लखनऊपासून जवळच असलेल्या मलिहाबाद येथील रहिवासी आहे. रमेश मौर्या हे एका खासगी कंपनीत काम करत होते. मात्र, कमी शिक्षणामुळे त्यांना तुंटपुज्या पगारावर समाधान मानत घर चालवावे लागत होते. तर त्यांच्या पत्नी गावी आपली चार बिघे जमीन कसत, भाजीपाला पिकांचे उत्पन्न (Agriculture Business) घेत होत्या. कोरोनानंतर रमेश यांनी गावी येत आपल्या पत्नीला शेतीमध्ये साथ देण्याचे ठरवले. यापूर्वी रमेश नोकरी तर किरण शेती बघत होत्या. मात्र,सध्या दोघेही एकत्रिपणे शेती करत असल्याने त्यांना अधिकचे उत्पन्न मिळण्यास मदत झाली आहे.

सेंद्रिय भाजीपाल्याला मोठी मागणी

महिला शेतकरी किरण मौर्या सांगतात, आपण 20 वर्षांपासून शेती करत असून, त्यावेळी आपण केंद्रीय उपोष्ण फळबाग संस्थेच्या लखनऊ येथील केंद्राच्या मदतीने भाजीपाला शेतीचे विशेष प्रशिक्षण घेतले होते. आपल्याकडे स्वतःची 4 बिघे जमीन असून, आपण त्यात काकडी, वांगी यासह अन्य पालेभाजीपाल्याची शेती करत आहोत. विशेष म्हणजे आपण सेंद्रिय पद्धतीने या पिकांचे उत्पादन घेत आहोत. ज्यामुळे आपल्याकडील उत्पादित या भाजीपाल्याला मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. याशिवाय गायींच्या चाऱ्यासाठी काही जमिनीत मका पिकाचे उत्पादन देखील घेत आहेत.

किती मिळतंय उत्पन्न?

महिला शेतकरी किरण मौर्या यांनी आपल्या शेतीला व्यावसायिक स्वरूप दिले असून, आपल्या शेतीमध्ये सर्व सेंद्रिय भाजीपाला त्या दुबग्गा बाजार समितीत विक्रीसाठी पाठवतात. त्या-त्या हंगामानुसार वर्षभर भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतात. त्यातून त्यांना वार्षिक 6 लाखांची कमाई हमखास होत असल्याचे त्या सांगतात. विशेष म्हणजे किरण यांचे पती केवळ 10 वी पास तर त्या स्वतः अशिक्षित असून, शेती व्यवसायातील यशाच्या जोरावर त्यांनी आपल्या मुलांना उत्तमरीत्या शिक्षण दिले आहे. याशिवाय सेंद्रिय भाजीपाला शेतीच्या माध्यमातून त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये मागील काही वर्षात चांगला बदल झाल्याचे त्या सांगतात.

error: Content is protected !!