हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या अनेक तरुण मुले उच्च शिक्षण घेत, आपल्या ज्ञानाचा वापर शेती किंवा शेतीसंबंधित व्यवसायामध्ये (Agriculture Business) करत आहेत. त्यामुळे आता जर तुम्हाला ही एखाद्या व्यवसायात उतरायचे असेल. तर वराहपालन व्यवसाय तुमच्यासाठी योग्य असणार आहे. वराहपालनातून मांस विक्रीतून मोठी कमाई तर होतेच याशिवाय डुकराचे मांस आणि त्याच्या कातडीपासून वेगवगेळ्या वस्तू बनवाल्या जातात.इतकेच नाही तर डुकरांच्या केसांची देखील मोठया प्रमाणात वापर होतो. त्यामुळे आज आपण वराहपालनात (Agriculture Business) नेमक्या काय-काय संधी आहेत. ज्याद्वारे तुम्ही लाखांची कमाई करू शकतात. याबाबत जाणून घेणार आहोत.
अन्य व्यवसायांच्या तुलनेत कमी खर्च (Agriculture Business Opportunities)
शेतकरी प्रामुख्याने गाय, म्हैस आणि बकरी यांचे पालन केले जाते. मात्र, दुग्ध व्यवसाय (Agriculture Business) करणाऱ्यांची संख्या अधिक झाल्याने देशभरातील शेतकऱ्यांना दुधासाठी कमी दर मिळतो. अशातच चारा, ढेप, या जनावरांच्या बाबींच्या किमती देखील भरमसाठ वाढल्या आहेत. गाय-म्हशी-शेळी पालनादरम्यान त्यांच्याकडे खूप खूप लक्ष द्यावे लागते. त्या तुलनेत वराहपालन मात्र कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे. याशिवाय हा व्यवसाय उभा करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक भांडवलाची देखील गरज नसते. ज्यामुळे सध्या वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
कोणकोणत्या वस्तू बनतात?
दरम्यान, वराहपालन हा कमी खर्चिक तर आहेच. याशिवाय वराहपालपनातून मांसाव्यतिरिक्त अनेक मार्गाने कमी होते. डुकरांचे केस हे देखील अनेक ठिकाणी वापरले जातात. एका डुकरापासून साधारपणे एकावेळी 200 ते 300 ग्राम केस मिळतात. या डुकरांच्या केसापासून दाढी करण्याचे ब्रश, धुण्यासाठी ब्रश, चित्रकारांचे ब्रश, चटई, आणि पॅराशूटच्या शीट बनवले जातात. याशिवाय डुकरांच्या अनेक घटकांचा बाहेर देखील अन्य व्यवसायामध्ये केला जातो. जसे की डुकराची चरबी ही मेणबत्ती निर्मिती उद्योगात, खतांमध्ये, दाढीच्या क्रीम आणि रसायने उद्योगात वापरली जाते.
वराहपालनाचे अन्य उपयोग
पशुपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी केवळ गाय किंवा म्हैस या मध्येच न अडकून राहता. डुक्कर पालनाबाबतचे (Agriculture Business) फायदे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. डुक्करपालनातून ८० टक्के मांस मिळते. जे विकून शेतकऱ्यांना लाखोंची कमाई मिळू शकते. याशिवाय डुकराच्या कातडीपासून देखील अनेक वस्तू बनवल्या जातात. ज्यामुळे डुक्करांच्या कातडीला चामडी उद्योगातून मोठी मागणी असते. याशिवाय डुकराचे रक्त देखील अनेक व्यवसायांमध्ये वापरले जाते. यामध्ये प्रामुख्याने बूट पॉलिश कलर, औषनिर्मिती व्यवसाय, पशु आहार, खते याशिवाय कापडनिर्मिती व्यवसायामध्ये कापड रंगवण्यासाठी देखील त्याचा वापर केला जातो. याशिवाय अनेक ठिकाणी डुकरांची हाडे देखील वापरली जातात. ज्यामुळे इतक्या साऱ्या गोष्टींसाठी डुकरांच्या अनेक बाबींचा वापर होतो. हे पाहून नक्कीच त्याच्या लाखोंच्या कमाईचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
वराहपालनाचे वैशिष्ट्ये
- कमी भांडवलात (कमीत कमी 60 ते 80 रुपयांचे भांडवल) कमी जागेत अधिक नफा मिळवून देणारा व्यवसाय (वार्षिक 3 ते 4 लाख रुपयांचा नफा).
- डुक्करांच्या आहारावर जास्त काम करण्याची गरज नसते. त्यांना सडलेली किंवा खराब झालेली फळे, भाजीपाला किंवा शिळे आणि अन्य टाकाऊ पदार्थ देऊन सुद्धा त्यांचे पालन केले जाऊ शकते.
- एक मादी डुक्कर 114 ते 115 दिवसांमध्ये 6 ते 7 पिल्लांना जन्म देते. त्यामुळे कमी कालावधीत डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.
- एका डुकराच्या पिल्लाची किंमत ही दोन हजार रुपये इतकी असते.
- हा व्यवसाय सुरु केल्यास शेतकऱ्यांना गाय, म्हैस, शेळी यांच्याप्रमाणे अधिक लक्ष देण्याची गरज नसते.
- एका संपूर्ण वाढ झालेल्या डुकरापासून 60 से 70 किलो मांस मिळते.
- वराहपालन सुरू करताना त्यांच्या रहिवासाची जागा, त्यांची सुधारित/ संकरित जातींची निवड करणे खूप गरजेचे असते.