Agriculture Business : भाड्याने घेतली शेती, भाजीपाल्यातून महिन्याला करते 2 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशभरात महिला सर्वच आघाड्यांवर (Agriculture Business) बाजी मारत आहेत. शेती क्षेत्र हे देखील त्यापासून वेगळे राहिलेले नाही. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात काही महिला शेतकऱ्यांनी भाडे तत्वावर शेती घेत, त्यातून आपली आर्थिक प्रगती साधल्याचे अनेक उदाहरणे समोर आली आहे. अशातच आता आणखी एका 27 वर्षीय मुलीने भाडे तत्वावर शेती घेऊन, त्यातून वार्षिक 45 लाखांची कमाई करत असल्याचे समोर आले आहे. तिच्याकडे सध्या जवळपास 20 मजूर दररोज कामाला असून, आज आपण तिच्या भाडे करारावरील शेतीबद्दल (Agriculture Business) जाणून घेणार आहोत.

कशी धरली शेतीची वाट? (Agriculture Business Vegetable Farming)

अनुष्का जैसवाल असे या महिला शेतकऱ्याचे नाव असून, ती उत्तरप्रदेशातील लखनऊच्या मोहनलालगंज येथे राहते. तिने चार वर्षांपूर्वी 2021 मध्ये लखनऊपासून नजीक असलेल्या सिसेंडी या गावात एक एकर शेती भाडे तत्वावर (Agriculture Business) घेत, शेतीला सुरुवात केली होती. आज ती 6 एकर जमीन भाड्याने घेऊन, आधुनिक पद्धतीने शेती करत आहे. विशेष म्हणजे शेतकरी अनुष्का जैसवाल हिने दिल्लीच्या द हिंदू कॉलेजमधून अर्थशास्त्रात उच्चशिक्षण घेतले आहे. तिच्या घरातही सर्व उच्च शिक्षित आहे. यामध्ये भाऊ पायलट, बहीण वकील तर वहिनी सॉफ्टवेयर इंजिनीअर असल्याचे ती सांगते. मात्र, अर्थशास्त्रीय दृष्ट्या आपल्याला शेतीचे महत्व समजल्याने, आणि कृषी क्षेत्रात आवड निर्माण झाल्याने आपण हे क्षेत्र निवडल्याचे ती सांगते.

शेतीला आधुनिकतेची जोड

महिला शेतकरी अनुष्का जैसवाल हिने शेतीला सुरुवात करण्याअगोदर त्याबाबत सर्व प्लान तयार केला. ज्यामुळे तिला सरकारकडून सरकारी योजनांच्या माध्यमातून शेतीसाठी अनुदान मिळण्यास मदत झाली. तिने प्रामुख्याने शेती करण्यासाठी भाडे तत्त्वावरील सहा एकर जमिनीत पॉली हाउस, ठिबक सिचन व्यवस्था अशी सर्व आधुनिक प्रणाली उभारली आहे. त्यासाठी अनुष्का यांना जवळपास 90 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळाल्याचे त्या सांगतात. त्यांच्याकडे सध्या 20 हुन अधिक मजूर असून, त्यांनी सर्व मजुरांना तंत्रज्ञानाचा वापर करत आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी प्रशिक्षित केले आहे.

कोणत्या पिकांची लागवड

महिला शेतकरी अनुष्का जैसवाल ही प्रामख्याने जैविक पद्धतीने भाजीपाला पिकाची लागवड (Agriculture Business) करते. यासाठी बाजाराचा आढावा घेऊन आपले पीक अधिक भाव मिळण्याच्या टप्प्यात कसे काढणीला येईल. यावर त्या भर देत असल्याचे सांगतात. शेतकरी अनुष्का जैसवाल या प्रामुख्याने आपल्या 6 एकर शेतीमध्ये हंगामानुसार शिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, काकडी यासह अन्य सर्व भाजीपाला पिकांची लागवड करतात. कमी जमिनीतून जैविक पद्धतीने अधिक आर्थिक लाभ कसा मिळवता येतो? हे आपल्याला शेतीतून समजल्याचे त्या सांगतात.

किती मिळतंय उत्पन्न?

चालू हंगामात अनुष्का जैसवाल यांनी पॉली हाउसमध्ये इंग्लिश काकडीची लागवड केली आहे. जिचे त्यांना आतापर्यंत जैविक पद्धतिने कोणतेही रासायनिक खते न वापरता 50 टन उत्पादन मिळाले आहे. तर अन्य एका प्लॉटमध्ये त्यांनी लाल आणि पिवळ्या रंगाच्या शिमला मिरचीची लागवड केली आहे. ज्यातून त्यांना आतापर्यंत 35 टन उत्पादन मिळाले असल्याचे त्या सांगतात. इतकेच नाही आपल्याला सध्या लखनऊ मार्केटमध्ये दोनही पिकांना चांगला दर मिळत आहे. याशिवाय आपण जैविक पद्धतीने भाजीपाला उत्पादन घेत असल्याने, काही प्रमाणात माल मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये पाठवत असलयाचे त्या सांगतात. अर्थात आपण वर्षभरात आलटून पालटून भाजीपाल्याचे उत्पादन घेत असल्याने, आपल्याला खर्च वजा जाता मासिक 2 लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचे महिला शेतकरी अनुष्का जैसवाल सांगतात.

error: Content is protected !!