Agriculture Business : शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभारली कंपनी; वर्षाला कमावतायेत 1 कोटी रुपये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रचंड इच्छाशक्ती असेल तर त्या जोरावर माणूस काहीही (Agriculture Business) करू शकतो. मग ते शेती क्षेत्र असो किंवा मग शेती संबंधित क्षेत्र असो. माणूस त्यात सर्वोच्च शिखरावर पोहचल्याशिवाय राहत नाही. असाच काहीसा अनुभव सध्या पाहायला मिळत आहे. मुलीच्या लग्नासाठी जपून ठेवलेल्या पैशातून शेतकऱ्याने काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. आज ही शेतकरी उत्पादक कंपनी वार्षिक 80 लाखांची कमाई करत आहे. याशिवाय येत्या काळात आपल्या कंपनीला वार्षिक एक कोटींच्या टर्नओव्हरपर्यंत (Agriculture Business) नेण्याचा आपला विचार असल्याचे या कंपनीच्या स्थापनकर्त्या शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

खते-बियाणे पुरवठा (Agriculture Business Seeds Fertilizers)

शेतकरी महेंद्र यादव यांनी बिहार राज्यातील मधेपुरा जिल्ह्यात काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन ही शेतकरी उत्पादक कंपनी (Agriculture Business) स्थापन केली आहे. जलांचल फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी असे या कंपनीचे नाव असून, या एफपीओमार्फत शेतकऱ्यांना बियाणे अंबानी शेतीसाठीची खते पुरवली जात आहे. 2008 पासून महेंद्र यादव यांच्या मनात शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा विचार मनात होता.

वार्षिक 1 कोटींचा टर्नओव्हर

मात्र, अपेक्षित भांडवल नसल्याने, ते त्यामध्ये उतरण्याची हिम्मत करत नव्हते. अशातच 2017 मध्ये त्यांनी 200 शेतकऱ्यांना सोबत घेऊन, जलांचल फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी ही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. आज त्यांची कंपनी शेतकऱ्यांना खते आणि बियाणे विक्री करून वार्षिक 80 लाखांचा टर्नओवर करत आहे. यंदा त्यांना आर्थिक संपल्यानंतर आपल्या कंपनीमार्फत एक कोटीचा टर्नओव्हर होण्याची अपेक्षा आहे. त्यांनी कंपनी उभारल्याने परिसरातील शेतकऱ्यांना सहजपणे बियाणे-खते उपलब्ध होत आहे.

सुरुवातीला 200 शेतकऱ्यांची साथ

शेतकरी महेंद्र यादव सांगतात, सुरुवातीला आपण मुलीच्या लग्नासाठी वाचवून ठेवलेले काही पैसे वापरले. याशिवाय नाबार्डसोबत जोडले जाऊन शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय परिसरातील 200 शेतकऱ्यांना सोबत घेतले. ज्यातून जलांचल फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. कंपनीसाठी भाड्याने जमीन घेतली, दुकानासाठी जागा घेतली. कंपनीसाठीची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली.

जोडलेत 600 शेतकरी

सध्याच्या घडीला कंपनीसोबत 600 शेतकरी जोडले गेले असून, या सर्व शेतकऱ्यांना निर्धारित किमतीत खते आणि बियाणे उपलब्ध करून दिली जातात. एका शेतकऱ्यासाठी कंपनीच्या शेअरची किंमत 1 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. एक शेतकरी 10 हजार रुपयेपर्यंत शेअर खरेदी करू शकतो. ज्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत राहण्यास मदत होते. अर्थात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याची प्रगती जलांचल फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीमार्फत साधली जात आहे.

error: Content is protected !!