हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना खते आणि औषधे यांची रोजच (Agriculture Business) आवश्यकता असते. देशात प्रामुख्याने खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात वेगवेगळी पिके घेतली जात असल्याने बाजारात खते आणि औषधांना नेहमीच मागणी असते. त्यामुळे तुम्ही देखील इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड अर्थात इफकोच्या माध्यमातून खते आणि औषधांचे दुकान सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही इफकोच्या माध्यमातून डिलरशिप मिळवून स्वतःचे औषध दुकान सुरु करू शकतात. यात दुकानासाठी किती जागा लागते? किती भांडवल आवश्यक असते? यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे? कोणती कागदपत्रे लागतात? याबाबत (Agriculture Business) आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
किती जागेची असते आवश्यकता? (Agriculture Business Start Fertilizer Shop)
कोणताही व्यवसाय (Agriculture Business) सुरु करण्यासाठी त्यासाठी प्रथम जागेची सर्वात मोठी आवश्यकता असते. तुम्हालाही इफकोच्या माध्यमातून खते आणि औषधांचे दुकान सुरु करायचे असल्यास तुम्हाला मोक्याच्या ठिकाणी ‘इफको बाजार सेंटर’ सुरु करण्यासाठी जवळपास 1000 स्वेअर फुटाच्या जागेची आवश्यकता असणार आहे. ज्या ठिकाणाहून तुम्ही तुमचा व्यवहार सांभाळू शकतात. याशिवाय जवळच कुठेतरी खते ठेवण्यासाठी गोदामाची जागा असणे आवश्यक असते. गोदामाची जागा ही मुख्यतः सुरक्षित असावी. जेणेकरून पावसाळा काळात खतांचे नुकसान होणार नाही.
किती भांडवल लागते?
जागेनंतर दुसरी सर्वात मोठी आवश्यकता असते ती भांडवलाची. कारण ‘इफको बाजार सेंटर’ सुरू करण्यासाठी तुम्हाला खते उपलब्ध करावी लागणार आहे. त्यासाठी तुमच्याकड़े डिपॉझिट स्वरूपात इफकोकडून काही रक्कम जमा केली जाते. याशिवाय जो माल तुम्ही कंपनीकडून घेणार आहात. त्याचा भरणा करण्यासाठी देखील तुम्हाला काही पैशांची आवश्यकता असणार आहे. अर्थात अशा दोन्ही स्वरूपात तुम्हाला ‘इफको बाजार सेंटर’ सुरु करण्यासाठी एकूण 10 ते 20 लाख रुपये भांडवल आवश्यक असणार आहे. यात गोदाम खर्च, दुकान खर्च असा सर्व प्रकारचा खर्च समाविष्ट आहे.
कामगारांची आवश्यकता
आता तुम्हाला ‘इफको बाजार सेंटर’ सुरु करायचे म्हटले तर ते चालवण्यासाठी माणसांची अर्थात कामगारांची गरज देखील पडणार आहे. तुम्ही एकटे काही सर्व व्याप सांभाळू शकणार नाही. यासाठी तुम्हाला कमीत कमी दोन किंवा तीन कामगारांची गरज पडणार आहे. प्रामुख्याने तुम्हाला तुमचे दुकान कसे चालते? यावरून माणसांची गरज पडणार आहे. त्यामुळे गरजेनुसार याबाबतची तरतूद देखील तुम्हाला करावी लागणार आहे.
डिलरशिपसाठी कोणती कागदपत्रे?
तुम्हाला डिलरशिपसाठी सरकारचा परवाना मिळवणे देखील आवश्यक असणार आहे. याव्यतिरिक्त ‘इफको बाजार सेंटर’ डिलरशिपसाठी पुढील काही कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. यामध्ये प्रामख्याने दुकानाच्या जागेचा गाव नमुना-8, दुकानाची उभारायची जागा तुमच्या मालकीची नसल्यास भाडेपट्ट्याचा करार, तुमचे शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, कृषी आणि खते याबाबत आवश्यक माहिती असणे आवश्यक असते. या सर्व बाबींची पडताळणी करून तुम्हाला डीलरशिप दिली जाते.
सरकारी व्यवसाय परवाना आवश्यक
खतांचे दुकान तुम्ही अन्य दुकानांप्रमाणे सुरु करू शकत नाही. तुम्हाला त्यासाठी परवाना मिळवणे आवश्यक असणार आहे. कारण तुम्ही ज्या शेतकऱ्यांना खतांची विक्री करणार आहात. त्या सर्वांचे पीक हे तुमच्या खतावर अवलंबून असणार आहे. अशा शेतकऱ्यास तुमच्या खतामुळे काही अडचण आल्यास, सरकारकडून खतांचे दुकान सुरु करण्यासाठी परवाना अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला परवाना खूप महत्वाचा असणार आहे.
कुठे काढाल परवाना?
हा परवाना तुम्ही राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ या पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज करून काढू शकतात. त्या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला नोंदणी करावी लागेल आणि मग कृषी विभाग निवडून ‘कृषी परवाना सेवा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे. ज्यासाठी तुम्हाला काही फी देखील लागणार आहे. तुम्ही नेमकी खते, औषधे, बियाणे यापैकी कशासाठी अर्ज करताय? यावर फी अवलंबून असते. या परवान्यासाठी तुम्हाला दुकान टाकायचे आहे, त्या जागेचा गाव नमुना-8, ग्रामपंचायतीचे ना-हरकत प्रमाणपत्र, शॉप अॅक्टचे प्रमाणपत्र, दुकानाची उभारायची जागा तुमच्या मालकीची नसल्यास भाडेपट्ट्याचा करार, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र या कागदपत्रांची गरज असणार आहे.