Agriculture Business : सेंद्रिय शेतीच्या आवडीपोटी नोकरी सोडली; आज करतायेत कोटींची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना काळानंतर शेती व्यवसायाला (Agriculture Business) मोठे महत्व प्राप्त झाले आहे. ज्यामुळे अनेक जण नोकरीच्या मागे न लागता, गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीला रामराम करून शेतीमध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील दोन भावांनी देखील असाच काहीसा मार्ग निवडला असून, ते सध्या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून वार्षिक तीन कोटींची कमाई करत आहे. त्यांनी स्वतःचे जैविक ब्रॅण्ड्स विकसित केले आहे. इंदापूर तालुक्यातील भोडणी येथील सत्‍यजीत आणि अंजिक्‍य हांगे हे बंधू सेंद्रिय शेतीद्वारे ‘टू ब्रदर्स ऑर्गेनिक फार्म’ (Agriculture Business) स्थापन करत अनेकांसाठी आदर्श बनले आहे.

दोघेही बंधू उच्चशिक्षित (Agriculture Business Two Brothers Organic Farming)

सत्‍यजीत आणि अंजिक्‍य हांगे हे दोघेही उच्चशिक्षित (Agriculture Business) असून, त्यांनी पुण्यातील एका बोर्डिंग स्‍कूलमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कॉम्पुटर सायन्स आणि अर्थशास्रामध्ये पदवी मिळवल्यानंतर, त्या दोघांनी पुणे विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण पुणे केले. याच उच्च शिक्षणाच्या जोरावर त्यांनी कोटक बँक आणि एचडीएफसी बँक या देशातील अग्रगण्य बँकांमध्ये नोकरी देखील मिळाली. मात्र, शिक्षणादरम्यान पुण्यापासून १५० किलोमीटर दूर असलेल्या आपल्या भोडणी या गावी दोघेही भाऊ जात होते. तेव्हा घरच्यांसोबत शेतीत जाणे त्यांच्यासाठी नवीन नव्हते. त्यामुळे शेतीतील वातावरणाबाबत त्यांना लवकर जुळवून घेता आले.

सेंद्रिय वस्तूंचे ब्रँड विकसित

शेती करण्याच्या आवडीतून दोघही भावांनी एकत्रितपणे विचार करत, नोकरीला रामराम ठोकला. 2012 साली त्यांनी नोकरी सोडून शेतीमध्ये पाऊल ठेवले. त्यावेळी त्यांनी शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने पिके घेण्यावर भर दिला. त्यातूनच त्यांनी 2017 साली ‘टू ब्रदर्स ऑर्गेनिक फार्म’ नावाने सेंद्रिय वस्तूंचा व्यवसाय (Agriculture Business) सुरु केला. आज त्यांच्या व्यवसायाचा टर्नओव्हर वार्षिक तीन कोटी रुपये इतका आहे. विशेष म्हणजे या दोघा भावांनी शेती करण्यास सुरुवात केली. तेव्हा ते खूप कमी जमिनीत जैविक पद्धतीने पिके घेत होते. मात्र, आज त्यांनी आपल्या जैविक शेतीला 20 एकरापर्यंत विस्तारले आहे. ते शेती करताना शेणखताचा सर्वाधिक वापर करतात.

अनेक देशांचा केलाय दौरा

सत्‍यजीत आणि अंजिक्‍य हांगे हे दोघेही भाऊ नोकरी सोडून, जैविक शेतीसोबतच जैविक उत्पादनांच्या निर्मितीत उतरले. त्यापूर्वी त्यांनी जवळपास 10 वर्ष बँकिंग क्षेत्रात नोकरी केली होती. मात्र, 12 वर्षांपूर्वी त्यांनी घेतलेला निर्णय सार्थ खरा ठरवून दाखवत त्यांनी आज रोजच्या वापरातील अनेक उत्पादने जैविक पद्धतीने विक्री करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी ‘टू ब्रदर्स ऑर्गेनिक फार्म’च्या माध्यमातून तांदूळ, तूप. डाळी, गुलकंद, च्यवनप्राश आणि लाडूसहित अनेक जैविक उत्पादनांचे ब्रँड विकसित केले आहे. हे सर्व ब्रँड ग्राहकांमध्ये चांगलेच फेमस असून, त्यातून त्यांनी मोठी आर्थिक प्रगती साधली आहे. दोघाही भावांनी जैविक उत्पादनांबाबत आजपर्यत अनेक देशांचा दौरा केला असल्याचे ते सांगतात.

error: Content is protected !!