Agriculture Bussiness : शेतकऱ्यांनो… ‘हा’ शेतीआधारित उद्योग उभारा; मिळेल प्रचंड नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : वेगवेगळे व्यवसाय त्यांच्या मागणीप्रमाणे चालत असतात. व्यवसायाच्या (Agriculture Bussiness) माध्यमातून तयार उत्पादने ही ग्राहकांसाठी विशिष्ट गोष्टींसाठी उपयोगी ठरतात व त्याप्रमाणेच अशा उत्पादित वस्तूंना एक बाजारपेठ निर्माण होत असते. आता व्यवसायांमध्ये बरेचसे व्यवसाय हे शेतीशी निगडित असतात व शेतीशी निगडित व्यवसाय ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा (Agriculture Bussiness) मिळवून देणारे ठरत आहे.

कच्चा माल सहजरित्या उपलब्ध (Agriculture Bussiness Rice Mill)

शेतीशी निगडित असणाऱ्या व्यवसायांमध्ये जो काही कच्चामाल लागतो तो स्थानिक शेतकऱ्यांकडून बऱ्यापैकी उपलब्ध होतो. अशा मालावर प्रक्रिया करून तो बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना विकून खूप चांगला नफा मिळवता येतो. याशिवाय कच्चा माल स्थानिक शेतकऱ्यांकडून उपलब्ध होत असल्याने त्याचा वाहतूक खर्च देखील वाचतो. इतकेच नाही तर खाण्याशी संबंधीत असलेले कुठलेही व्यवसाय आपल्या देशामध्ये चांगल्या प्रमाणात चालतात. कारण भारताची लोकसंख्या ही सदैव वाढती असल्याने, अशा व्यवसायांना चांगली संधी आहे.

याच पार्श्वभूमीवर आपण शेतात उत्पादित झालेला धानाचे टरफले काढून म्हणजेच धानावर प्रक्रिया करून, तांदळाची बाजारपेठेत विक्री केली. तर निश्चितच या माध्यमातून एक चांगला व्यवसाय स्थापन होऊ शकतो. यालाच आपण ‘राईस मिल’ असेही म्हणू शकतो. आज आपण या व्यवसायाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

राईस मिल कशी सुरु करावी?

राईस मिलमध्ये दररोज हजारो टन धान्याचे कांडप, त्यावर प्रक्रिया करून व ते धान्य त्याच्या प्रतवारीप्रमाणे वेगळे करून व स्वच्छ करून ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पाच किलोची बॅगपासून ते 50 किलोपर्यंतच्या पॅकिंगमध्ये ते बाजारात विकता येते. जर आपण यामध्ये तांदळाचा विचार केला तर बासमती, इंद्रायणी, आंबेमोहर व कोलम अशा तांदळाच्या प्रमुख व मुख्य बाजारपेठेत मागणी असलेल्या जाती असून, बाजार भावाप्रमाणे शेतकऱ्यांकडून जर भात खरेदी केली व स्थापन केलेल्या राईस मिलमध्ये प्रक्रिया करून तो बाजारात विकला तर आपला एक स्वतःचा ब्रँड तयार करता येतो.

बरेचशे राईस मिल व्यावसायिक याच पद्धतीने हा व्यवसाय करतात. जर भांडवलाची क्षमता असेल तर अशा नवीन उद्योजकांनी या व्यवसायात येण्यास काहीच हरकत नसून, ग्रामीण व शहरी भागातील सर्वच किराणामाल दुकानांमध्ये त्यासोबतच सुपर मार्केट, मॉल्स इत्यादी ठिकाणी मागणीप्रमाणे पुरवठा करून पैसा कमावता येऊ शकतो.

error: Content is protected !!