Agriculture College : ‘या’ जिल्ह्यात नवीन कृषी महाविद्यालय; लातूर कृषी महाविद्यालयाचे नूतनीकरण – मुंडे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या (Agriculture College) तातडीच्या दुरुस्तीसाठी तत्काळ २ कोटी रुपयांचा निधी देण्याचा तसेच संपूर्ण नूतनीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा. असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज कृषी विभागाला दिले आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या, लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालया (Agriculture College) बाबतच्या अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश (Agriculture College Latur Renovation)

आमदार सतीश चव्हाण यांच्या मागणीवरून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आमदार सतीश चव्हाण, आमदार रमेश कराड, महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषदेचे संचालक हेमंत पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ.जहागीरदार, गोविंदराव देशमुख तसेच मंत्रालयातील विविध अधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी छत्रपती संभाजीनगर येथे कृषी महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही कृषिमंत्री मुंडे यांनी दिले आहेत.

‘या’ ठिकाणी नवीन कृषी महाविद्यालय

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकही शासकीय कृषी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी महाविद्यालय नसल्याने नवीन महिला कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी निधी मागणीचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्याचे निर्देशही यावेळी कृषीमंत्री मुंडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आले संशोधन केंद्रास मिळणार जमीन

कृषी विभागाने गल्ले बोरगाव, ता.खुलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर येथे आले संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उपलब्ध असणारी विद्यापीठाची जमीन अपुरी असल्यामुळे पळसवाडी येथील जमीन या प्रकल्पासाठी मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी विद्यापीठाने छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने जमीन मागणीचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही मुंडे यांनी यावेळी दिले आहेत.

error: Content is protected !!