Agriculture Crop Advisory: शेतकरी बंधुंनो, किमान तापमानात घट होत आहे; पीक व्यवस्थापना सोबतच पशूंची घ्या काळजी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture Crop Advisory: हवामान विभागाच्या अंदाजानुसार डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किमान तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे. यावेळी पिकासोबतच पशूंची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे (Agriculture Crop Advisory). वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने खालील शिफारसी दिलेल्या आहेत. त्याचा अवलंब प्रत्येक शेतकर्‍याने जरूर करावा.

कापूस: कापूस वेचणी पंधरा दिवसाच्या अंतराने करावी. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचा. पहिल्या आणि दूसर्‍या वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा. कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी(Agriculture Crop Advisory). 

तूर: उशिरा पेरणी केलेल्या तूर पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व फायटोफथोरा मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.4 ग्रॅम + मेटॅलॅक्झील + मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (Agriculture Crop Advisory).

ज्वारी: उशिरा पेरणी केलेल्या ज्वारी पिकावरील खोडमाशी, खोडकिडी व लष्करी अळी या किडींच्या व्यवस्थापनासाठी नोमुरीया रिलाई 40 ग्रॅम प्रति 10 लिटर  किंवा थायमिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकात तण नियंत्रणासाठी पिकात कोळपणी करून घ्यावी (Agriculture Crop Advisory).

मका: लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  80 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 80 मिली प्रति एकर वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी (Agriculture Crop Advisory).

रब्बी सूर्यफूल: आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे .

फळबागेचे व्यवस्थापन: (Agriculture Crop Advisory)

केळी बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बागेस पहाटे मोकाट पद्धतीने पाणी द्यावे. थंडी पासून रक्षणासाठी केळीच्या घडांना प्लास्टिक पेपरने आच्छादन करावे (Agriculture Crop Advisory).

आंबा बागेत पाणी व्यवस्थापन करावे. 

द्राक्ष बागेत घडांचा आकार वाढवण्यासाठी द्राक्ष घड पहिल्यांदा 10 पीपीएम जिब्रॅलिक ॲसिडच्या द्रावणात बुडवावेत.

भाजीपाला: भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मिली किंवा डायमेथोएट 30% 13 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (Agriculture Crop Advisory).

पशुधन व्यवस्थापन: (Livestock Management)

  • थंडीपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदानाचे पडदे लावा, त्यामुळे पहाटेच्या थंड वाऱ्यापासून त्यांचे संरक्षण होईल.
  • कोंबडयाच्या शेडमध्ये इलेक्ट्रिक बल्ब लावा.
  • पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधता गोठ्यात बांधा.
  • पशुधनातील प्रजननाच्या समस्यांचे वेळेत निदान आणि योग्य उपचार न केल्यास अधिक तोटा उदभवतो. राज्य शासनाच्या “राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियानातंर्गत” आपल्या कडील सर्व जनावरांची गाभण करण्याबाबतची तपासणी व उपचार करून घ्यावेत.
error: Content is protected !!