शेतकऱ्यांनो, खते आणि बी-बियाणे खरेदी करताना सावधानता बाळगा; कृषी विभागाचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । पेरणीचा हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांची धावपळ सुरू होते. पेरणीसाठी त्यांना बी-बियाणे, खते इ. खरेदी करावे लागते. पण हे खरेदी करतांना आपण थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण आपली फसवणूक होऊ शकते. बी-बियाणे आणि खतामध्ये भेसळ असू शकते. त्यामुळे आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते. आणि आपल्या उत्पन्न क्षमतेत देखील घट होऊ शकते. म्हणून आपण थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे.

आपण बियाणे, खत खरेदी करतांना नेहमी अधिकृत विक्रेत्याकडून घेतले पाहिजे. जो त्यांच्या प्रोडक्टची हमी देईल. हे सगळं खरेदी करताना त्याची पावती नक्की घ्या. पेरणी झाल्यानंतरही बियाण्याच्या पिशव्या, टॅग, पावती, थोडे बियाणे सांभाळून ठेवा. बियाणे खरेदी करतांना त्याची एक्सपायरी डेट बघून घ्या. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्याचे पाकीट सीलबंद आहे की नाही याची खात्री करून घ्या. अश्या प्रकारे सावधानता बाळगण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी तक्रारीविषयी माहिती प्रत्यक्ष, दूरध्वनी, ई-मेल, SMS आदीद्वारे देऊन शासनाच्या गुणनियंत्रण अभियानात सहभागी होण्याचे आवाहन कृषी अधिकारी भाऊसाहेब बरहाटे यांनी केले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभाग भरारी पथक ठेवण्यात येणार आहेत.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा👇🏼👇🏼👇🏼*
https://chat.whatsapp.com/GkHDokKFuPu1dQERW7Urj7

Leave a Comment

error: Content is protected !!