Agriculture Disputes : जमिनीचा वाटा प्रथम लहान भाऊच का उचलतो? ‘पहा’ कायदा काय सांगतो?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आजकाल शेत जमिनीची वाटणी होताना गावागावात काही कुटुंबांमध्ये मोठी वादावादी (Agriculture Disputes) होताना पाहायला मिळते. इतकेच काय काही भावा-भावामध्ये तर आयुष्यभर वैर निर्माण होते. त्याला चांगला वाटा मिळाला, मला हलका वाटा मिळाला. अशा कुरबुरी नेहमीच ऐकायला मिळतात. मात्र जमिनीचे वाटप करण्याचे काही कायदेशीर नियम आहेत का? कोणत्या मुद्द्यावरून जमिनीचे वाटप केले जाते? कशी होते भावा-भावांमध्ये जमिनीची वाटणी? (Agriculture Disputes) याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

जमीन मोजणी मोबाईलवरून कशी करायची? सातबारा, नकाशा कसा डाउनलोड करायचा?

शेतकरी मित्रांनो अनेकवेळा जमिनीबाबत मोजणीवरून वाद होत असतात. तुमच्या सातबारावर जेवढी जमीन दिसतेय तेवढी जमीन प्रत्यक्ष आहे का हे पाहण्यासाठी आम्ही तुम्हाला एक जुगाड सांगणार आहे. आता तुम्ही घरीबसुन तुमचे शेत अगदी अचूक मोजू शकता. यासाठी प्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करायचे आहे. या अँपवर जमीन मोजणी सोबत सातबारा उतारा डाउनलोड करणे, नकाशा काढणे तसेच रोजचे बाजारभाव चेक करणे आदी कामे करता येतात. तसेच सरकारी योजनांना अर्ज करण्याची सुविधा देखील Hello Krushi अँप वर देण्यात आली आहे. २ लाख शेतकरी वापरत असलेल्या Hello Krushi अँप ला आजच डाउनलोड करून लाभार्थी बना.

शेतजमिनीचे वाटप (Agriculture Disputes Younger Brother Right)

एखाद्या कुटुंबातील वडिलोपार्जित जमीन भावांमध्ये किंवा वारसांमध्ये वाटप करताना जमिनीचे समान हिस्से केले जातात. त्यात पहिला हिस्सा आवडीनुसार उचलण्याचा मान लहान भावाला मिळतो. त्यानंतर लहान भावाने उचलेल्या वाट्यानंतर उर्वरित वाटे हे अन्य भावांना उतरत्या क्रमाने वाटून दिले जातात. शेवटी उरलेला वाटा हा मोठा भावाला दिला जातो. वडिलोपार्जित शेती वाटताना पहिला हिस्सा उचलण्याचा मान छोट्या भावालाच मिळावा, हा आजपर्यत पूर्वापार चालत आलेला नियम आहे. त्यामुळे प्रथम जमिनीत वाटा उचलण्याचा मान लहान भावाला मिळतो.

वडिलोपार्जित घराचे वाटप

शेतजमिनीप्रमाणेच वडिलोपार्जित घराची देखील याच परंपरागत पद्धतीने वाटणी (Agriculture Disputes) होते. कुटुंबाची सहान जागा वा घराचे समान हिस्से केले जातात. त्यातून प्रथम लहान भाऊ आणि मगच बाकीचे भाऊ वाटा उचलतात. पण लहान भावाने जो वाटा उचलला त्याच्यावर बाकीचे वाटे ठरतात. मात्र याबाबत देखील असा काही लिखीत किंवा कायदेशीर स्वरुपात नियम उपलब्ध नाही. लहान भाऊ हा लहान असल्याने हा परंपरागत नियम चालत आलेला आहे. त्यामुळे मोठ्या भावाने सामंजस्यपणा घेऊन, हा नियम मान्य करावा लागतो. तो मोठा आहे म्हणून असा रिवाज पडला असावा, अशी समजूत मोठ्या भावाने स्वतःची घालायची असते.

‘हा’ कायदेशीर नियम आहे का?

कायद्यात जमीन किंवा वडिलोपार्जित संपत्ती वाटपाबाबत कोणत्याही विशेष नियमांची तरतूद करण्यात आलेली नाही. हिंदू उत्तराधिकार कायद्याद्वारे वडिलोपार्जित मालमत्तेचे विभाजन, शेतजमिनीचे वाटप नियंत्रित करण्यात आले आहे. या कायद्यात केवळ संपत्तीच्या सर्व कायदेशीर वारसांमध्ये (भाऊ आणि बहिणींसह) मालमत्तेचे समान वितरण करावे, इतकीच तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, जमीन वाटपाची हीच पद्धत आजपर्यंत चालत आलेली आहे. ज्यात लहान भाऊ प्रथम वाटा उचलतो. त्यामुळे सामाजिक सलोखा आणि सामंजस्यपणाने हा नियम मान्य करून जमीन वाटप अन्य भावांनी मान्य गरजेचे असते. याउलट महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये मोठ्या भावाला शेतजमिनीची उजवी बाजू दिली जाण्याची प्रथा आहे. जी पूर्वापार चालत आलेली आहे. मात्र हा देखील कायदेशीर नियम नाही. ही समाजमान्य रीत आहे. भारतात, मोठ्या भावाला किंवा छोट्या भावाला शेतजमीन कोणत्या दिशेने द्यावी? हे ठरवणारा कोणताही कायदेशीर नियम नाही. वैयक्तिक कुटुंबातील सदस्यांच्या रूढीनुसार ते ठरवले जाते.

error: Content is protected !!