Agriculture Electricity : शेतीसाठीच्या वीज दरात 12 टक्क्यांपर्यंत वाढ; शेतकऱ्यांना मोठा धक्का!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांना शेतमालाचे उत्पादन (Agriculture Electricity) घेताना उत्पन्न कमी आणि खर्चच अधिक होतो. अशातच आता शेतकऱ्यांना शेतीपंपासाठीच्या विजेसाठी अधिकचा खर्च करावा लागणार आहे. प्रामुख्याने राज्यातील सर्वच घटकांच्या वीजदरात महावितरणकडून वाढ करण्यात आली आहे. त्यात कृषी क्षेत्राचाही समावेश असून, शेतीसाठीच्या वीज दरात 6 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना वीज (Agriculture Electricity) दरवाढीचा शॉक सहन करावा लागणार आहे.

असे आहेत नवीन वीज दर (Agriculture Electricity Rate Hike Upto 12 Percent)

चालू आर्थिक वर्षांपासून अर्थात 1 एप्रिल 2024 पासून ही शेतीपंपासाठीची दरवाढ (Agriculture Electricity) लागू असणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणच्या या दरवाढीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार यापूर्वी 2022-23 या वर्षासाठी लहान शेती पंपासाठी असणारा वीज दर हा 3.30 रुपये प्रति युनिट होता. ज्यात आता 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 4.56 रुपये प्रति युनिटपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय 2022-23 या वर्षासाठी अधिक क्षमतेच्या शेती पंपासाठी 4.24 रुपये प्रति युनिट दर होता. जो आता 2024-25 या आर्थिक वर्षात 6.38 रुपये प्रति युनिट असणार आहे.

उत्पन्नच नाही, वाढीव दराने बिल भरायचे कसे?

दरम्यान, यापूर्वी महावितरणने पहिल्या टप्प्यात मागील वर्षी 1 एप्रिल 2023 या आर्थिक वर्षात जवळपास तीन टक्के वीज दरवाढ करण्यात आली होती. तर सध्या लागू करण्यात आलेली 6 टक्के दरवाढ ही दुसऱ्या टप्प्यातील असून, ती 2024-25 या चालू आर्थिक वर्षासाठी लागू असणार आहे. परिणामी, यंदा संपूर्ण वर्षभरात शेतकऱ्यांना काहीही हाती लागलेले नसताना, वीज दरात झालेली वाढ ही शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का मानली जात आहे. शेतीतून योग्य आर्थिक उत्पन्नच मिळाले नसेल तर या वाढीव दरातील वीज बिलाचा भरणा करायचा कसा? प्रश्न आता शेतकर्यांसमोर उभा ठाकणार आहे.

error: Content is protected !!