Agriculture Exhibition in VNMKV: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे कृषि मेळावा आणि कृषी प्रदर्शनीचे भव्‍य आयोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, (Agriculture Exhibition in VNMKV) परभणी आणि परभणी आत्मा, कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालय (भारत सरकार), नवी दिल्ली पुरस्‍कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनाचे भव्य आयोजन 21 ते 23 फेब्रुवारी 2024 दरम्यान करण्यात आले आहे (Agriculture Exhibition in VNMKV).  

हा मेळावा आणि कृषी प्रदर्शन विद्यापीठाच्या क्रीडा संकुल प्रांगणात करण्यात येत असून या कृषि मेळाव्‍यात पश्चिम भारतातील महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तिसगड, गोवा या राज्यासह दिव-दमन आणि दादर नगर हवेली येथील शेतकरी बांधव, कृषी तज्ज्ञ, कृषि संशोधक, धोरणकर्ते, विविध कृषी कंपन्या, कृषि अधिकारी, कृषि विस्‍तारक, आणि कृषि उद्योजक हजारोच्‍या संख्येने सहभागी होणार आहेत.

मेळाव्‍यासाठी देशातील आणि राज्यातील सन्माननीय मंत्री महोदयांना आमंत्रित करण्यात आले आहे. मेळाव्‍याचा मुख्य विषय ‘हवामान-अनुकूल शाश्वत शेतीद्वारे शेतक-यांची समृद्धी’ हा असणार आहे. यावेळी विविध चर्चासत्रे, शास्‍त्रज्ञ-शेतकरी संवाद याद्वारा विविध विषयावर तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्‍याचा उद्घाटन सोहळा दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन कार्यक्रमास राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष मा. ना. श्री. पाशाभाई पटेल उपस्थित राहणार आहेत.

राज्याचे माननीय कृषिमंत्री मा. ना. श्री. धनंजय मुंडे हे दिनांक २३ फेब्रुवारी रोजी समारोपीय कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून  उपस्थित राहणार आहेत.

सदर शेतकरी मेळावा आणि  कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील नाविन्यपूर्ण कृषि तंत्रज्ञान, कृषि संशोधन पाहण्याची सुवर्ण संधी शेतकरी बांधवांना उपलब्ध होणार आहे.

या भव्य कृषि प्रदर्शनात (Agriculture Exhibition in VNMKV) अद्ययावत कृषी तंत्रज्ञानावर आधारित विविध सार्वजनिक संस्‍था, खासगी कंपन्या, अशासकीय संस्‍था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गट यांच्याच २०० पेक्षा जास्त दालनाचा समावेश राहणार आहे. यात विशेषत: दर्जेदार बी-बियाणे, रोपे, खत, कीटकनाशके, कृषी औजारे, कृषी निविष्ठा, डिजिटल तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, आधुनिक सिंचन पध्‍दती, पशुधन इत्यादी दालनांचा समावेश राहील.

या प्रसंगी पीक प्रात्यक्षिक भेटी आणि खाद्य महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. सर्व कृषी बांधव, कृषि उद्योजक, कृषि अधिकारी आणि कृषि विस्‍तारक यांनी कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनाचा (Agriculture Exhibition in VNMKV) अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि आणि विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी केले आहे (Agriculture Exhibition in VNMKV).

error: Content is protected !!