Agriculture Exhibition : भीमा कृषी महोत्सव शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारा – अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी हा स्वाभिमानी आहे. तो सन्मानाने जगण्याचा प्रयत्न करतो. कोल्हापूरात आयोजित ‘भीमा कृषी महोत्सव’ (Agriculture Exhibition) हा शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारा महोत्सव आहे, असे गौरवोग्दार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. ते कोल्हापूरच्या मेरी वेदर ग्राऊंडवर 26 ते 29 जानेवारी या कालावधीत भरविण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या सांगता समारंभात बोलत होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडीक, आमदार राजेश पाटील आदी (Agriculture Exhibition) उपस्थित होते.

टोकाचे पाऊल उचलू नका (Agriculture Exhibition In Kolhapur)

शेतकऱ्यांनी अशा महोत्सवातून नवनवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करावे, भविष्यात डीपीडीसीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव (Agriculture Exhibition) भरविता येईल का? याबाबत विचार सुरु असून मंत्रीमंडळाच्या आगामी बैठकीत, ऊस हार्वेस्टरला सबसिडी देण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे सुतोवाच पवार यांनी केले आहे. तसेच दूध, संत्रा, धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मदत केली आहे. तर द्राक्ष, कांदा उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेवू नये. असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

पुरस्कारांचे वितरण

या कृषी महोत्सवात नेर्ली येथील सागर पाटील यांच्या खिलार खोंडाला ‘चॅम्पियन ऑफ शो’ तर गोलू टू या रेड्यास ‘बेस्ट ऑफ द शो’ या पुरस्कारने गौरविण्यात आले. गेली 4 दिवस मेरी वेदरच्या मैदानावर भरावल्या गेलेल्या या कृषी महोत्सवाला जवळपास 6 ते 7 लाख शेतकऱ्यांनी भेट दिली तर साधारणपणे या महोत्सवाद्वारे किमान 15 कोटींची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे खासदार धनंजय महाडीक यांनी म्हटले आहे. याशिवाय यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या काही कृषी अधिकाऱ्यांना अजित पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

error: Content is protected !!