Agriculture Exhibition : परभणी विद्यापीठ व भारतीय कृषी संस्थेदरम्यान करार; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी औद्योगिकीकरण (Agriculture Exhibition) व शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्यात चार कृषी विद्यापीठे वसंतराव नाईक यांच्या काळात स्थापन करण्यात आली. त्यापैकीच एक असलेल्या परभणी येथील नामांकित वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेसोबत (आयएआरआय) एक करार केला आहे. हा करार प्रामुख्याने कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्‍तार शिक्षण कार्याकरता करण्‍यात आला आहे. ज्वाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा (Agriculture Exhibition) होणार असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तसेच परभणी (आत्‍मा) व कृषी विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने विद्यापीठात 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनाचे (Agriculture Exhibition) आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या मदतीने या देशातील पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय कृषी संशोधन संस्था (आयएआरआय) आणि परभणी विद्यापीठ यांच्यामध्ये हा करार करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? (Agriculture Exhibition Parbhani Agriculture University)

सध्याच्या घडीला परभणी कृषी विद्यापीठाचे सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी आणि अनेक पिकांचे वाण शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. या करारामुळे केंद्र सरकारच्या आयएआरआय आणि विद्यापीठ यांच्या संशोधनास आणखी मदत होणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक गुणवत्तेची बियाणे मिळण्यास मदत होणार आहे. याशिवाय शेतीसाठीचे विविध तंत्रज्ञान यांचे देखील देवाणघेवाण सोपे होणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे.

संशोधनास मदत होणार

इतकेच नाही तर आगामी काळात शेतकऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. या करारामुळे विद्यापीठाला संशोधनात मदत होणार आहे. पर्यायाने विद्यापीठातील विद्यार्थ्यांना देखील संशोधनास मदत होणार आहे. त्यामुळे आता या दोन्ही संस्थांमधील हा करार शेतकरी आणि विद्यार्थी या दोघांसाठीही महत्वपूर्ण ठरणार असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

या कृषि मेळाव्‍यात पश्चिम भारतातील महाराष्‍ट्रासह गुजरात, राजस्‍थान, मध्‍य प्रदेश, छत्‍तीसगड, गोवा, दीव-दमन आणि दादर नगर हवेली इत्‍यादी सहा राज्‍यातील शेतकरी, कृषी तज्ञ, कृषि संशोधक, कृषि कंपन्‍या, कृषि अधिकारी, कृषि विस्‍तारक, आणि कृषि उद्योजक हजारोच्‍या संख्‍येने सहभागी झाले होते. याशिवाय खासगी कंपन्‍या, शेतकरी उत्‍पादक कंपन्‍या आणि बचत गट यांचे 300 हुन अधिक स्टॉल पाहायला मिळाले.

error: Content is protected !!