Agriculture Export : देशातील शेतमालाच्या निर्यातीत 10 टक्क्यांनी घट; पहा संपूर्ण आकडेवारी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : “2023-24 यावर्षीच्या चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत देशातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीत (Agriculture Export) १० टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. यावर्षीच्या पहिल्या आठ महिन्यांच्या कालावधीत 15.729 अब्ज डॉलर मूल्याची कृषी उत्पादने निर्यात झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 17.425 अब्ज डॉलर नोंदवली गेली होती. अर्थात यावर्षी कृषी निर्यातीत 9.73 टक्के इतकी घट नोंदवली गेली आहे.” अशी माहिती केंद्र सरकारच्या अन्न आणि कृषी निर्यात विकास प्राधिकरणाकडून (एपीडा) कडून आपल्या मासिक अहवालात (Agriculture Export) जाहीर करण्यात आली आहे.

फळे-भाजीपाल्याच्या निर्यातीत वाढ (Agriculture Export From India)

चालू आर्थिक वर्षात भारतातून एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये प्रामुख्याने बासमती तांदळाच्या निर्यातीत (Agriculture Export) वाढ झाली आहे. गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध घातल्याने त्याच्या निर्यातीत घट नोंदवली गेली आहे. याशिवाय या कालावधीत गहू निर्यातीमध्ये 98 टक्के, दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीमध्ये 32 टक्के घट झाली आहे. याउलट ताजी फळे आणि भाजीपाला यांच्या निर्यातीमध्ये मात्र 20 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. असेही एपीडाने आपल्या निर्यात आकडेवारीमध्ये म्हटले आहे.

बासमती तांदळाच्या निर्यातीत वाढ

यावर्षी बासमती तांदळाच्या निर्यातीत 11 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. सौदी अरेबिया आणि इराक यांसारख्या देशांमधून वाढलेल्या मागणीमुळे बासमती तांदळाच्या निर्यातीत ही वाढ झाली असून, ती 29.94 लाख टन नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 27.32 लाख टन इतकी नोंदवली गेली होती. मूल्य स्वरूपात विचार करता, यावर्षी बासमती तांदळाची निर्यात 3.7 अब्ज डॉलर मूल्याची झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 2.87 अब्ज डॉलर मूल्य किमतीची नोंदवली गेली होती.

गैर-बासमती तांदूळ, गहू निर्यात घटली

याउलट एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत गैर-बासमती तांदळाची निर्यात 3.07 अब्ज डॉलर मूल्याची होऊ शकली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 4.10 अब्ज डॉलर मूल्याची नोंदवली गेली होती. अर्थात यावर्षी गैर बासमती तांदळाच्या निर्यातीत घट झाली आहे. दरम्यान, यावर्षी गहू निर्यातीत 98 टक्क्यांनी घट नोंदवली गेली असून, ती यावर्षी 29 दशलक्ष डॉलर मूल्याची झाली आहे. जी मागील वर्षी याच 1.50 अब्ज डॉलर मूल्याची नोंदवली गेली होती.

पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीत वाढ

मांस आणि पोल्ट्री उत्पादनांची निर्यात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत 6.31 टक्क्यांनी वाढून, ती 2.88 अब्ज डॉलर मूल्याची झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 2.70 अब्ज डॉलर नोंदवली गेली होती. म्हशीच्या मांसाची निर्यात 13 टक्क्यांनी वाढून, 2.40 अब्ज डॉलर झाली आहे. जी मागील वर्षी 2.17 अब्ज डॉलर नोंदवली गेली होती. तर पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीत 39 टक्क्यांनी वाढ होऊन, ती 113 दशलक्ष डॉलर्सची नोंदवली गेली आहे. याशिवाय दुग्धजन्य पदार्थांची निर्यात 32.86 टक्क्यांनी घसरून, 283 दशलक्ष डॉलर नोंदवली गेली आहे.

error: Content is protected !!