Agriculture Export : भारतीय फळे, भाजीपाल्याच्या निर्यातीत 16 टक्क्यांनी वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय फळे आणि भाजीपाल्याची मागणी (Agriculture Export) वाढली आहे. 2023-24 यावर्षीच्या एप्रिल ते फेब्रुवारी या 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये फळे आणि भाजीपाल्याच्या निर्यातीत 16 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तर तर केळीच्या निर्यातीत 50 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली झाली आहे. यावर्षी अमेरिका नेदरलँड हे दोन देश भारतीय फळांचे सर्वात मोठे खरेदीदार बनले आहेत. तर युनायटेड किंग्डम हा भारतीय भाज्यांचा सर्वात मोठे खरेदीदार देश (Agriculture Export ) बनला आहे.

निर्यातीत दरवर्षी वेगाने वाढ (Agriculture Export From India)

केंद्र सरकारने रशिया, ऑस्ट्रेलिया आणि इतर युरोपीय देशांना शेतमाल निर्यात (Agriculture Export) करण्याचे धोरण अवलंबले आहे. यापूर्वी भारतीय फळे आणि भाजीपाला केवळ आखाती आणि आशियाई देशांमध्ये निर्यात केला जात होता. मात्र, सध्या रशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन देशांमध्ये भारतीय फळांची मागणी दरवर्षी वेगाने वाढत आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्ष एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये भारतीय फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत 15.38 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. तर केळीच्या निर्यातीत 50 टक्क्यांनी वाढ नोंदवली झाली आहे.

भारताचा वाटा केवळ एक टक्का

जागतिक बाजारपेठेत भारतीय फळे आणि भाजीपाला निर्यातीचा (Agriculture Export) वाटा सुमारे एक टक्का इतका आहे. अर्थात भारताला फळे आणि भाजीपाल्याच्या निर्यातीमध्ये खूप काम करणे आवश्यक आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार, फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत प्रामुख्याने हिरवी मिरची आणि केळी निर्यातीचे प्रमाण वाढले आहे. तर बटाट्याची निर्यातही बऱ्यापैकी होत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातून देखील आंब्याची निर्यात रशियासह इतर देशांमध्येही हळूहळू वाढत असल्याचे सरकारच्या आकडेवारीवरून पाहायला मिळत आहे.

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारताने 2023-24 एप्रिल-फेब्रुवारी या आर्थिक वर्षात 3.22 अब्ज डॉलरची फळे आणि भाज्यांची निर्यात केली आहे. यापूर्वी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये याच कालावधीत फळे व भाजीपाल्याच्या निर्यातीचा आकडा 2.79 अब्ज डॉलर नोंदवला गेला होता. भारतीय भाजीपाल्याच्या खरेदीदारांमध्ये यूके, श्रीलंका, बांगलादेश आणि सौदी अरेबिया हे देश आघाडीवर आहेत. तर अमेरिका, नेदरलँड्स, इराण, इराक आणि यूएई या देशांमध्ये भारतीय फळांना सर्वाधिक मागणी आहे.

error: Content is protected !!