Agriculture Export : मालदीवला 35,749 टन कांद्यासह, साखर, अंडी निर्यात होणार; केंद्राची मंजुरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी (Agriculture Export) आहे. शुक्रवारी (ता.5) केंद्र सरकारने मालदीव या देशाला कांदा, बटाटा, अंडे, तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर आणि डाळींची निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या झालेल्या निर्णयानुसार, भारताकडून मालदीवला 35,749 टन कांदा, 21,513 टन बटाटा, 43 कोटी अंडे, सव्वा लाख टन तांदूळ, 1 लाख 9 हजार टन गव्हाचे पीठ, 64,494 टन साखर तर सव्वा दोनशे टन डाळींची निर्यात (Agriculture Export) करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.

निर्यातीमुळे काय परिणाम होणार (Agriculture Export To Maldive From India)

मालदीव आणि भारत या दोन देशांमधील द्विपक्षीय करारानुसार या सर्व शेतमाल वस्तूंची निर्यात (Agriculture Export) केली जाणार आहे. परिणामी, सध्या भारतात कांद्याचे दर घसरलेले असताना 36 हजार टन कांदा निर्यातीला परवानगी मिळाल्याने, कांदा दराला अल्प का होईना. परंतु बळ मिळण्यास मदत होणार आहे. याशिवाय भारतातून जवळपास 43 कोटी अंडे मालदीवला पाठवली जाणार आहे. सध्याच्या घडीला अंड्याचे दर घसरलेले असताना, याचा पोल्ट्री उद्योगाला देखील काहीसा फायदा होणार आहे. तर बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना देखील या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

मालदीवसोबत भारताचे सैन्य संबंध

दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये चीनचा प्रभाव वाढत आहे. ज्यामुळे भारताने मालदीव या देशासोबत सलोख्याचे सैन्य संबंध निर्माण करण्यावर भर दिला आहे. मागील काही महिन्यांमध्ये भारताचे मालदीवसोबत संबंध काहीसे खराब झाले होते. मात्र, सध्या दोन्ही देशांकडून त्यात सुधारणेसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सध्याच्या घडीला भारत सरकारने मालदीवला तांदूळ, गव्हाचे पीठ, कांदा, बटाटा, अंडे, डाळी, साखर निर्यात केली जाणार आहे. विशेष म्हणजे यातील कांदा, साखर, तांदूळ, गहू निर्यातीवर बंदी असली तरी सरकारकडून विशेष अधिकाराचा वापर करून,सरकारी संस्थांमार्फत ही निर्यात केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

error: Content is protected !!