Agriculture Irrigation : शेतीतील पाणी वापर प्रति टनासाठी 2 ते 3 पटीने अधिक – रमेश चंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतामध्ये जगाच्या तुलनेत एकूण 2.4 टक्के शेतीयोग्य जमीन (Agriculture Irrigation) आहे. तर जगातील एकूण पाण्याच्या तुलनेत 4 टक्के पाणी आहे. मात्र, सध्या देशातील खूप मोठ्या भागामध्ये पाण्याची समस्या जाणवत आहे. अशातच आता नीती आयोगाचे सदस्य प्रोफेसर रमेश चंद यांनी म्हटले आहे की, अनेक विकसित आणि विकसनशील देशांच्या तुलनेत सध्या भारतात कोणत्याही पिकाच्या एका प्रति टन उत्पादनासाठी दोन ते तीन पटीने अधिक पाणी वापरले जात आहे. रब्बी हंगामात मुख्यतः मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर (Agriculture Irrigation) वाढला आहे. हे चित्र बदलण्याची गरज आहे. असेही त्यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली येथे जागतिक जल दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

खर्च अधिक सिंचन कमी (Agriculture Irrigation Water Consumption)

रमेश चंद यांनी म्हटले आहे की, 1995 ते 2015 या कालावधीत देशामध्ये सर्व छोट्या-मोठ्या सिंचन प्रकल्पांवर (Agriculture Irrigation) कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, देशातील सिंचनाखालील जमीन तितकीच आहे. २०१५ नंतर आजपर्यंत देशातील देशातील सिंचनाखालील क्षेत्र ४७ टक्क्यांवरून वाढून ते ५५ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील पाणी वापराबाबतचे चित्र बदलण्याची गरज असून, विशेषतः राज्य सरकारांनी स्थानिक पर्यावरण आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन, शेती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

जागरूकता निर्माण करण्याची गरज

यावेळी केंद्र सरकारच्या कृषी विभागाचे आयुक्त डॉ. पी. के. सिंह, भारतीय कृषी संशोधन संस्थेचे उपमहासंचालक डॉ. आर. सी. अग्रवाल यासह काही नामांकित कृषी विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. यावेळी कृषी विभागाचे आयुक्त डॉ. पी. के. सिंह यांनी म्हटले आहे की, एका कालव्याच्या माध्यमातून सध्या 100 हेक्टर जमीन सिंचनाखाली (Agriculture Irrigation) येत आहे. यात बदल करून एका कालव्याच्या मदतीने 150 हेक्टर जमिनीचे सिंचन अशक्यप्राय असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. तर कृषी क्षेत्रामधील पाणी बचतीसाठी देशातील शेतकरी आणि तरुण यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी शेतकऱ्यांना सिंचनाच्या आधुनिक तंत्रांबाबत जागरूक करणे आवश्यक आहे. असे भारतीय कृषी संशोधन संस्थेचे उपमहासंचालक डॉ. आर. सी. अग्रवाल यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!