Agriculture Loan: शेतकऱ्यांना मिळेल आता केवळ 5 मिनिटांत कृषी कर्ज! नाबार्ड आणि आरबीआय मध्ये झाला करार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकऱ्यांना आता बँकेतून कृषी कर्ज (Agriculture Loan) घेण्यासाठी 3 ते 4 आठवडे वाट पाहावी लागणार नाही. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (NABARD) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) शाखा आरबीआयएच (RBIH) सोबत करार केला आहे ज्यामुळे शेतकर्‍यांना केवळ 5 मिनिटांत कर्ज (Agriculture Loan) मिळू शकेल.

या करारा अंतर्गत, नाबार्डने विकसित केलेले ई-केसीसी लोन (e-KCC loan) प्लॅटफॉर्म रिझर्व्ह बँकेच्या पूर्ण मालकीच्या रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबच्या (RBIH) पब्लिक टेक प्लॅटफॉर्म फॉर फ्रिक्शनलेस क्रेडिट (PTPFC) शी जोडले जाईल. नाबार्डने सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी (आरआरबी) डिजिटल किसान क्रेडिट कार्ड (KCC) कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे क्रेडिट सिस्टम प्लॅटफॉर्म तयार केले आहे.

या भागीदारीमुळे अॅग्री लोन प्रक्रियेतील अनेक अडथळे दूर होतील आणि शेतकर्‍यांना त्वरित कर्ज (Agriculture Loan) मिळू शकेल. यामुळे नाबार्डचे ग्रामीण समृद्धीला चालना देण्याचे मिशन पुढे जाईल, असे नाबार्डचे अध्यक्ष शाजी के.व्ही. यांनी म्हटले आहे.

कर्ज प्रक्रियेतील सुधारणा

नाबार्ड आणि आरबीआयएच यांच्यातील करारामुळे कर्जाची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक बनेल. शेतकर्‍यांना आवश्यक कागदपत्रे आणि माहिती त्वरित ऑनलाइन सबमिट करता येईल. कर्ज मंजूरीसाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज अर्जाच्या अद्ययावत स्थितीची त्वरित माहिती मिळेल.

5 मिनिटांत कर्ज (Agriculture Loan)

नाबार्डचे अध्यक्ष आणि रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बन्सल यांनी या करारावर स्वाक्षरी केली. त्यांच्या मते, या भागीदारीमुळे देशातील १२ कोटी शेतकर्‍यांसाठी कर्ज वाटपाचा कालावधी 3 ते 4 आठवड्यांवरून केवळ 5 मिनिटांवर येईल. हा करार शेतकर्‍यांसाठी एक वरदान ठरेल आणि त्यांना वेळेवर आणि सहजपणे कर्ज (Agriculture Loan) मिळण्यास मदत करेल.

error: Content is protected !!