Agriculture Machinary : ट्रॅक्टरचलित फुले बहुपीक टोकण यंत्रा’चे फायदे? वाचा… कसा होतो फायदा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये शेतकरी विविध कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांचा (Agriculture Machinary) वापर करू लागले आहेत. अगदी शेताची पूर्वमशागत असो की पिकांची लागवड आणि काढणी इत्यादी कामांसाठी शेतकरी आता यंत्राची मदत घेऊ लागले आहेत. यंत्राच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचतात आणि काम जलद गतीने होते व उत्पादनात देखील वाढ होते. आज आपण अशाच उपयुक्त ट्रॅक्टरचलीत ‘फुले बहुपीक टोकण यंत्राची’ (Agriculture Machinary) माहिती जाणून घेणार आहोत.

ट्रॅक्‍टरचलित फुले बहुपीक टोकण यंत्राचे फायदे (Agriculture Machinary For Farmers)

शेतकरी जेव्हा शेतीमध्ये ट्रॅक्‍टरचा वापर करतात तेव्हा ते बारा ते पंचवीस अश्‍वशक्तीचा ट्रॅक्‍टर वापरतात. याच्या साहाय्याने उस तसेच फळबागांमध्ये आंतरमशागतीची तसेच पेरणीची कामे केली जातात. या सगळ्या कामांमध्ये सुसंगतता यावी यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले बहुपीक टोकण यंत्र विकसित केले आहे.

या यंत्राची वैशिष्ट्ये

  • या यंत्राचा वापर करायचा असेल तर यासाठी बारा अश्वशक्ती आणि त्यापेक्षा अधिक क्षमतेचे ट्रॅक्टर उपयोगी ठरते.
  • या यंत्राचा वापर केल्यामुळे लागणारी मजुरी,वेळ आणि कष्ट यामध्ये खूप बचत होते.
  • सूर्यफूल,गहू,ज्वारी, सोयाबीन, हरभरा, मका, भुईमूग इत्यादी पिकांची टोकण करण्यासाठी हे यंत्र उपयुक्‍त ठरते.
  • एवढेच नाही तर दाणेदार खतांची व्यवस्थित पेरणी करता येण्यासाठी देखील याचा उपयोग होतो.
  • पारंपारिक पद्धती मध्ये होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत 40 ते 50 टक्के बचत होते.
  • पारंपरिक पद्धतीपेक्षा वेळेमध्ये 50 ते 60 टक्के बचत होते. इतर महत्त्वाचे फायदे

आपण जेव्हा पिकांची पेरणी किंवा लागवड करतो तेव्हा बऱ्याचदा एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवताना चूक होते. कधी कधी दाट लागवड होते व याचा विपरीत परिणाम हा रोपांवर होतो व दाटीमुळे पुरेसा सूर्यप्रकाश (Agriculture Machinary) मिळत नाही. त्यामुळे रोपांची विरळणी करण्याचे काम करावे लागते तसेच रोपांचे चुकीच्या अंतरामुळे खते व पाण्याचे नियोजन देखील चुकते.

परंतु लागवडीसाठी जर आपण अशा यंत्रांचा वापर केला तर निविष्ठांचा योग्य प्रमाणात आणि आवश्यक असा वापर करता येतो. रोपांचे व पेरणीचे अंतर योग्य प्रमाणात ठेवता आल्याने खत आणि पाणी व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने होते व एवढेच नाही तर हेक्टरी एकूण रोपांची संख्या देखील प्रमाणशीर पद्धतीत ठेवता येते.

error: Content is protected !!