Agriculture Machinery: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी विकसित शेतीची आधुनिक यंत्रे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (Agriculture Machinery) ‘कृषी यंत्रे आणि शक्ती अभियांत्रिकी’ विभागाने  विविध अवजारे, यंत्रे विकसित (MPKV, Rahuri) करून त्यांच्या शिफारशी केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या गरजा व समस्या लक्षात घेऊन तयार केलेल्या या आधुनिक यंत्रांमुळे शेतकऱ्यांचे कष्ट, वेळ वाचणार तर आहेच शिवाय मजुरीच्या खर्चात सुद्धा बचत होते. जाणून घेऊ या आधुनिक यंत्रांची (Agriculture Machinery) माहिती.  

ट्रॅक्टरचलित फुले अॅटोमॅटिक पल्टी नांगर (Agriculture Machinery)

या नांगराने जमिनीची नांगरणी योग्य त्या खोलीपर्यत करता येते तसेच हा नांगर हलक्या मध्यम व भारी जमिनीकरीता उपयुक्त आहे

  • 45 व त्यापेक्षा जास्त अश्व शक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते
  • ट्रॅक्टरच्या पोजिशियन कंन्ट्रोललिव्हर ने अॅटोमॅटिक पलटी करता येतो.
  • या नांगरामध्ये पल्टी करण्याकरीता मेकॅनिकल लिव्हर तसेच हायड्रोलिक सिलेडरची आवश्यकता नाही.
  • प्रक्षेत्रीय कार्यक्षमता 80 टक्के इतकी असून हायड्रोलिक नांगरापेक्षा देखभाल व दुरुस्तीचा खर्च कमी येतो.

ट्रॅक्टरचलित फुले हायड्रो – मेकॅनिक नियंत्रित फळबाग ऑफसेट व्यवस्थापन यंत्र

बागामध्ये एकाच वेळी जुनी मुळे कापण्यासाठी व बेड तोडण्यासाठी उपयुक्त

  • 35 व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते
  • पारंपारिक पध्दतीपेक्षा खर्चात 48 टक्के बचत
  • क्षमता 0.127 हेक्टर प्रति तास.

ट्रॅक्टरचलित फुले कुटटी यंत्र (Agriculture Machinery)

फळबागेतील छाटणी नंतर पडणा-या अवशेषांची कुटटी करुन बेडवर दोन्ही बाजुस समांतर टाकण्याकरीता उपयुक्त. उदा- द्राक्षे

  • 35 व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते
  • अवशेषांची कुटटी करण्याकरीता ट्रॅक्टरच्या पी टी ओ शक्तीचा वापर केला आहे तर कुटटी केलेल्या अवशेषांची बेडवर दोन्ही बाजूस समांतर टाकण्याकरीता हायड्रोलिक शक्तीचा वापर केलेला आहे.
  • प्रक्षेत्रीय क्षमता 78 टक्के असून एका तासात 0.47 हेक्टर क्षेत्रावर अवशेषांची कुटटी करुन टाकते.
  • पारंपारिक पध्दतीपेक्षा खर्चामध्ये 72 टक्के बचत.

ट्रॅक्टरचलित फुले हायड्रो मेकॅनिक नियंत्रित तण काढणी यंत्र (Weeding Machine)

फळ बागेतील झाडांच्या दोन ओळीतील तसेच दोन झाडांच्या मधल्या जागेतील तण काढण्यासाठी उपयुक्त

  • 25 व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.
  • या यंत्राचे रोटरी युनिट दोन झाडांच्या मध्ये व बाहेर हायडो-मेकॅनिकल यंत्रनेद्वारे सहजपणे कार्य करते.
  • प्रक्षेत्रीय कार्य क्षमता एका दिवसात सव्वा हेक्टर आहे.

ट्रॅक्टरचलित फुले ऊस रोपे पुर्नलागवड यंत्र (Seedling Replanting Machine)
– ४५ व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते
– एका दिवसात २.७५ ते ३.०० हेक्टर क्षेत्रावर ऊस रोपांची पुर्नलागवड करता येते.
– पारंपारिक पध्दतीपेक्षा खर्चात ६० ते ७० टक्के बचत होते
– पारंपारिक पध्दतापेक्षा वेळेत ७० ते ८० टक्के

विद्युत मोटारचलीत फुले ऊस बेणे तोडणी यंत्र

  • एक अश्वशक्तीच्या व सिंगल फेज विद्युत मोटार चलीत यंत्र
  • एका तासात 6500 ऊस बेणे तयार करता येते
  • पारंपारीक पध्दतीपेक्षा खर्चामध्ये 80 ते 85 टक्के बचत
  • पारंपारीक पध्दतीपेक्षा वेळेमध्ये 85 ते 95 टक्के बचत
  • ऊस रोपवाटीकेसाठी 40 ते 70 सें.मी. लांबीचे ऊस बेणे तयार करण्यासाठी उपयुक्त

ट्रॅक्टरचलित फुले बंदिस्त वाफे तयार करणारे अवजार

रब्बी ज्वारीसाठी जमिनीत पावसाचे पाणी मुरविण्यासाठी बंदिस्त वाफे तयार करता येतात.

  • 35 व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते
  • एका दिवसात 4 ते 4.5 हेक्टर क्षेत्रावर बंदिस्त वाफे तयार करता येतात.

विद्युत चलित कडबा कुटटी यंत्र (Kadaba Kutti Yantra)

ओला चारा तसेच कोरडा चारा कुटटी करण्यासाठी उपयुक्त कडबा कुटी यंत्र

  • लहान व मध्यम शेतकऱ्यासाठी विद्युत चलित
  • सिंगल फेज एक अश्वशक्ती विद्युत मोटार चलित यंत्र..

ट्रॅक्टरचलित फुले मोल नांगर

मोल नांगराचा उपयोग भारी काळया जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा आणि क्षारांचा निचरा करण्यासाठी होतो.

  • मोल नांगरासाठी सुमारे 25000 इतका खर्च येतो
  • मोल नांगराने मोल निचरा करण्यासाठी हेक्टरी रु. 1500 इतका खर्च येतो
  • मोल नांगर ६० ते ७२ एच. पी. ट्रॅक्टरद्वारे ओढता येतो
  • या यंत्राद्वारे दोन मोलमध्ये 4 मिटर अंतर ठेवलयास प्रतितासाला 0.3 हेक्टर क्षेत्र करता येते.
error: Content is protected !!