Agriculture Market Rate: कापूस आणि सोयाबीनच्या भावात चढ-उतार; जाणून घ्या काकडी, पपई आणि वांग्याचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्याकापूस आणि सोयाबीनच्या बाजारभावात (Agriculture Market Rate) चढ उतारामुळे मिश्र स्थिती जाणवत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील (Today’s Market Rate) सट्टेबाजीमुळे कापसाचे भाव कमी आहेत, तर सोयाबीनचे भाव एका मर्यादे पलीकडे सरकण्यास नकार देत आहेत. काकडी आणि पपईला उन्हाळ्यात वाढत्या मागणीमुळे चांगले भाव मिळत आहेत. तर वांग्याच्या भावात बदल नाही. जाणून घेऊ या सविस्तर बाजारभाव (Agriculture Market Rate).

कापूस (Agriculture Market Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सट्टेबाजीमुळे कापसाचे भाव (Cotton Rate) नरम आहेत. वायदे 81.45 सेंट प्रतिपाऊंड

देशातील वायदे 58 हजार 400 रुपये प्रति खंडी एवढे आहेत. बाजार समित्यांमध्ये भाव 7200 ते 7600 रुपये प्रति क्विंटल एवढे आहेत. पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

सोयाबीन

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात (Soybean Rate) दबाव कायम आहे. भाव एका मर्यादे पलीकडे सरकत नाही आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे कमी जास्त आहे. देशातील भाव 4200 ते 4600 रुपये प्रति क्विंटल एवढे आहे. पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता  आहे.

काकडी

उन्हामुळे काकडीची मागणी वाढली असून भावही (Cucumber Rate) चांगले मिळत आहे. लग्न समारंभ आणि कार्यक्रमांमुळेही मागणी वाढत आहे. त्यामुळे बाजारात आवकही चांगली आहे. भाव 1500 ते 1800 रुपये प्रति क्विंटल आहे. पुढील काळात आवक कमी होण्याची शक्यता, भाव चांगले राहण्याची शक्यता आहे.

पपई

उन्हामुळे आणि पाणी टंचाईमुळे उत्पादन कमी झाले आहे. बाजारातही आवक कमी झाली आहे. त्यामुळे पपईला भाव (Papaya Rate) चांगले मिळत आहे. सध्या1400 ते 2000 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत आहे. पुढील काळात आवक आणखी कमी होण्याची शक्यता, भाव चांगले राहण्याची शक्यता आहे.

वांगे

वांग्याला सध्या बाजारात 2000 ते 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव (Brinjal Rate) मिळत आहे.

लग्न सराईमुळे मागणी चांगली आहे. पाणी टंचाईमुळे उत्पादन कमी आणि आवकही कमी असल्यामुळे पुढील काही दिवसात आवक आणखी कमी होऊन भाव (Agriculture Market Rate) टिकून राहण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!