Agriculture Market Rate: सोयाबीनचे दर वाढता वाढेना; तुरीचे दर मात्र सुसाट! जाणून घ्या बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: धान्याच्या बाजार भावात (Agriculture Market Rate) सध्या वेगवेगळी परिस्थिती दिसत आहे. दरवर्षी भाव खाणारे सोयाबीनचे दर हंगामभर दबावात आहेत मात्र तुरीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या तुरीला 12 हजार रूपयांपेक्षा अधिकचा दर मिळत आहे. परंतु सोयाबीनला 5 हजार रूपयांचाही पल्ला गाठता आलेला नाही (Agriculture Market Rate) .

सोयाबीनचे दर (Soybean Rate)

सोयाबीनचे सध्याचे दर 4151 ते 4650 रुपये प्रति क्विंटल आहेत. तर गेल्या आठवड्यातील दर 4200 ते 4642 रुपये प्रति क्विंटल होते. यंदाच्या हंगामातील सोयाबीनचे अपेक्षित दर 5000 रुपये प्रति क्विंटल होते.

तूरीचे दर (Tur Rate)

सध्याचे दर 9900 ते 12,102 रुपये प्रति क्विंटल आहेत. तर गेल्या आठवड्यातील दर 9500 ते 12,000 रुपये प्रति क्विंटल होते.

नागपूरच्या कळमना बाजार समितीत सोयाबीनची आवक सरासरी 800 क्विंटल आणि तुरीची आवक 874 क्विंटल आहे.

तांदळाला (Rice Rate) 3500 ते 3800 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

टरबूज, टोमॅटो, वांगे, आणि लाल मिरचीचे दरही बदलले आहेत. चांगल्या प्रतीच्या संत्रा फळांना 4000 ते 5000 रुपये प्रति क्विंटल दर (Orange Rate) मिळत आहे.

शेतकर्‍यांमध्ये अस्वस्थता (Agriculture Market Rate)

सोयाबीनचे दर अपेक्षेपेक्षा कमी असल्याने शेतकर्‍यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यात पुढे खरीप हंगाम (Kharif Season) सुरु होणार आहे. त्यामुळे सोयाबीन बाजारभावाचा (Agriculture Market Rate) परिणाम खरीप लागवडीवर सुद्धा होऊ शकतो.

तुरीचे दर चांगले असले तरी त्याची आवक कमी आहे. यंदा अपुऱ्या पावसाचा (Insufficient Monsoon) तुरीच्या पि‍काला फटका बसल्याचे दिसत आहे.

तुरीचे दर वाढल्याने तूर डाळीचे भावही (Tur Dal Rate) वाढते आहे. गेल्या तीन दिवसांत डाळीचे दर प्रतिकिलो 21 रूपयांनी वाढले. 150 रुपये किलोवर असलेली डाळ सध्या 170 ते 171 रूपयांवर पोहोचली आहे. तर विना पॉलिश तूर डाळ (Unpolished Tur Dal) 180 ते 200 रुपये किलोवर आहे. सध्या विना पॉलिश धान्याला मागणी वाढत आहे.

error: Content is protected !!