Agriculture Market Rate: तुरीच्या भावात 800 रुपयांची घसरण; सोयाबीनचेही तेच हाल, शेतकरी परेशान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: तूर आणि सोयाबीनच्या बाजारभावात (Agriculture Market Rate) सध्या मोठी घसरण चालू झाली आहे. 5 दिवसांपूर्वी किंचितशी वाढ झाल्यानंतर आता पुन्हा या आठवड्यात सोयाबीन व तुरीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येते. सरासरी 4300 रुपये भाव (Agriculture Market Rate)असल्याने आणखी किती दिवस सोयाबीन घरात ठेवायचे? असा प्रश्न शेतकर्‍यांना (Farmer) पडत आहे.

शेतीत नानाविध प्रयोग करीत अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असल्याचे दिसून येते. एकीकडे रासायनिक खते, बी-बियाणे, मजुरी, मशागत खर्चात भरमसाठ वाढ होत आहे तर दुसरीकडे शेतमालाच्या किमतीत फारशी वाढ होत नसल्याने आर्थिक ताळमेळ बसविणे शेतकर्‍यांच्या आवाक्या बाहेर जात आहे. 2023 च्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तिला (Natural Calamities) सामोरा जावे लागले.

मारपीट व अवकाळी पावसामुळे तूर (Pigeon Pea) पि‍कालाही फटका बसला होता. नवीन सोयाबीन (Soybean) विक्रीसाठी बाजार समित्यांत दाखल झाल्यानंतर सुरुवातीला 4400 ते 5100 या दरम्यान भाव मिळाला मध्यंतरी सोयाबीनला (Soybean Bajar Bhav) प्रति क्विंटल सरासरी 5400 रुपये भाव मिळाला होता. 14 एप्रिलपर्यंत पाच हजारापर्यंत भाव मिळाला. आता पुन्हा सोयाबीनच्या दरात (Soybean Market Rate) घसरण सुरु झाल्याचे दिसून येते. वाशिम जिल्ह्यात किमान 4200 ते कमाल 4500 रुपये असा भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

800 रुपयाने तूर घसरली (Agriculture Market Rate)

15 दिवसांपूर्वी तुरीला (Tur Bajar Bhav) प्रति क्विंटल कमाल 12,500 रूपयांपर्यंत भाव मिळाला. आता कमाल 11,700 रुपये असा भाव मिळत आहे. जवळपास प्रति क्विंटल 800 रुपयांची घसरण झाल्याने याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे.

error: Content is protected !!