Agriculture News : शेतकऱ्याच्या शेतातुन तब्बल 2.5 लाखांचे टोमॅटो गेले चोरीला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture News : सध्या देशभरात टोमॅटोचे (tomato) भाव १०० ते १५० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. अशा परिस्थितीत भाज्या आणि सॅलडमध्ये टोमॅटो गायब झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. टोमॅटोच्या वाढत्या किमतीत कर्नाटकातील हसन जिल्ह्यात चोरीची एक अनोखी घटना समोर आली आहे. येथे एका महिला शेतकऱ्याच्या (Farmer ) शेतातील टोमॅटोची 60 पोती चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली आहे. चोरीला गेलेल्या टोमॅटोची किंमत अडीच लाख असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी महिला शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून हाळेबिडू पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Agriculture News)

नेमकं काय आहे प्रकरण?

हसनमधील गोनी सोमनहल्ली गावातील धारिणी या महिला शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह दोन एकर जमिनीवर टोमॅटोचे पीक घेतले होते. इतर राज्यांप्रमाणेच कर्नाटकातही टोमॅटोच्या दरात खूप वाढ झाली आहे. याचा फायदा घेत चोरट्यांनी 4 जुलै रोजी रात्री त्यांच्या शेतात पोहोचून टोमॅटोची 50 ते 60 पोती घेऊन पलायन केले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. (Marathi News)

चोरट्यांनी टोमॅटोची तर चोरी केली मात्र उभे पीक देखील उध्वस्त केले आहे. त्यामुळे महिला शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे महिला शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी भरपाईची मागणी केली. या घटनेबाबत पोलीस म्हणाले की, “आमच्या पोलिस ठाण्यात अशा प्रकारची चोरी होण्याची पहिलीच वेळ आहे. महिला शेतकऱ्याच्या मुलाने सरकारकडे चौकशीची मागणी केली आहे आणि नुकसान भरपाईचीही मागणी केली आहे.”

error: Content is protected !!