Agriculture News : व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे तातडीने दिले नाहीत तर होणार मोठी कारवाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture News : शेतकरी पोटच्या पोराप्रमाणे आपल्या शेतातल्या शेतमालाची निगा राखत असतात. त्याला मोठे करून अगदी कष्टाने पिकवलेला शेतमाल शेतकरी बाजारामध्ये विक्रीसाठी नेत असतात. बाजारामध्ये शेतकऱ्यांनी विक्रीला शेतमालनेला तर शेतकऱ्यांसोबत व्यापारी अयोग्य वर्तवणूक करतात. त्याचबरोबर जर शेतमाल खरेदी केला तर शेतकऱ्यांचे पैसे देखील वेळेवर देत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. (Agriculture News )

माहितीनुसार, व्यापाऱ्यांनाही शेतकऱ्याच्या शेतमालाचे पैसे ताबडतोब देणे बंधनकारक आहे. कारण की शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला त्यांचा शेतमाल ते व्यापाऱ्यांना कमी दरामध्ये देखील विकत असतात त्यामुळे व्यापाऱ्यांना पैसे देणे बंधनकारक आहे. मात्र यावेळी अनेक व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करतात काही लवकरात लवकर पैसे देत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. परंतु आता याच अनुषंगाने राज्याचे पणन संचालक शैलेश कोतमीरे यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

पणन संचालकांनी दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश

शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना जर त्यांचा शेतमाल विकला तर त्यानंतर व्यापाऱ्यांनी लगेचच शेतकऱ्यांना पैसे द्यावे. जर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे दिले नाही पैसे देण्यात जास्त दिवस लावले तर संबंधित व्यापाऱ्यावर आता कारवाई करण्याचे आदेश राज्याचे पणन संचालक शैलेश कोतमीरे यांनी दिले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

व्यापाऱ्यांवर होणार कारवाई

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे पैसे व्यापाऱ्यांनी वेळेवर देणे गरजेचे आहे. जर व्यापाऱ्यांनी असे केले नाही तर पणन संचालनालयाच्या माध्यमातून देखील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल व्यापाऱ्याला विकल्यानंतर त्या मालाचे वजन झाले की लगेच भावाप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक आहे असा आदेश पणन संचालनाकडून देण्यात आला आहे.

बऱ्याचदा पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र एकीकडे पिकाला योग्य भाव नसलेले टेन्शन आणि दुसरीकडे जर व्यापाऱ्यांनी शेतमालाचा दर असतील ते पैसे दिले नाहीत तर शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. याचाच विचार करून पणन संचालनालयाने हा निर्णय घेतला आहे.

पणन संचालकांच्या आदेशानुसार बाजार समितीमध्ये शेतमालाचे लिलाव झाल्यास व्यापाऱ्यांच्या खरेदी आणि विक्री सह विक्री दराची माहिती घेण्याचे काम हे बाजार समितीचे असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या माध्यमातून जर ज्या व्यापाऱ्यांनी या नियमांचे पालन केले नसेल त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे.

error: Content is protected !!