Agriculture News : चुकीची औषध फवारणी झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान; 900 संत्र्याची झाडे झाली खराब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture News : आपल्या पिकावर जर आपण चांगल्या औषधाची फवारणी केली तर आपले पीक जोमात येते. त्यामधून आपल्याला उत्पन्न देखील जास्त मिळून आपल्याला नफा चांगला मिळतो. मात्र आता अमरावतीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती जिल्ह्यात एका शेतकऱ्याला जबरदस्तीने औषध फवारणी करायला लावणे एका कृषी केंद्र चालकाच्या चांगले अंगलट आले आहे.

एका शेतकऱ्याने कृषी केंद्र चालकाने जबरदस्तीने औषध फवारणी करायला लावल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे शेतकऱ्याने संत्र्याच्या झाडावर औषध फवारणी केली असून त्या शेतकऱ्याची 900 झाड बाधित झाली आहेत. असा गंभीर आरोप शेतकऱ्याने कृषी केंद्र चालकावर केला आहे त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

या शेतकऱ्याच्या झाडाला लागलेली फळे आता गळू लागली आहेत त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. काही शेतकऱ्यांनी तर त्या कृषी केंद्र चालकाचा परवाना रद्द करावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील कृषी विभाग केंद्र चालकावरती कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी असा अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

कृषी केंद्र चालकाने चुकीचे औषध दिल्याचा आरोप

अमरावती जिल्ह्यामधील दिलापुर या ठिकाणी एक संत्रा उत्पादक शेतकऱ्याने चांदूरबाजार येथील शिवार कृषी केंद्रात बुरशीनाशक औषधाची मागणी केली. मात्र शेतकऱ्यांने जे औषध मागितले ते औषध कृषी केंद्र चालकाने न देता इतरच औषध दिले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

शेतकरी हतबल ९०० झाड बाधित

कृषी केंद्र चालकाने दिलेल्या औषधांची फवारणी या शेतकऱ्याने संत्राच्या झाडावर केली मात्र यानंतर याचे वाईट परिणाम शेतकऱ्याला दिसू लागले. फवारणी केल्यानंतर संत्रा झाडांची पाने गळून पडली त्यानंतर काही वेळाने फळे सुद्धा गळून खाली पडली. त्यामुळे आता शेतकऱ्यांची जवळपास 900 झाड बाधित झाले असून त्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता याबाबत जिल्ह्यातील कृषी विभागाकडे तक्रार दाखल झाली असून शिवार कृषी केंद्राचा परवाना रद्द करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

error: Content is protected !!