Agriculture News : शेतकऱ्यांना बोगस खते बियाणे, तसेच कीटकनाशके विकणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. अहमदनगर (Ahmednagar News) जिह्यामध्ये १९ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये बियाणे विक्रीचे ११, कीटकनाशके विक्रीचे सहा तर खत विक्रीच्या २ परवान्यांचा समावेश आहे. याबरोबरच ६० कृषी सेवा केंद्रांना विक्री बंदचे आदेश दिले आहेत.
जिल्हा कृषी कार्यालयाकडून १५ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकाने खतांच्या, बियाण्यांच्या आणि कीटकनाशकांच्या साडे तीन हजार नमुन्यांच्या तपासण्या केल्या आहेत. त्यापैकी सातशेपेक्षा जास्त नमुने तपासणीसाठी काढले आहेत. राज्य सरकारने बोगस बियाणे, खते यांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद करणारा कायदा करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.
शेतकऱ्यांनी या मोबाईल नंबरावर करावी तक्रार
यासंबंधी शेतकऱ्यांना आता बोगस खते व कृषी निविष्ठा विक्री होऊ नये, यासाठी कृषी निविष्ठा खरेदी करताना काही अडचणी आल्यास तक्रारींची तत्काळ दखल घेण्यासाठी मोबाईल नंबर जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणुकीची तक्रार थेट मोबाईल वरून करता येणार असल्याची घोषणा केली होती. आता या संदर्भात शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी राज्य सरकारमार्फत एक व्हाट्सअप क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे 9822446655 असा हा व्हाट्सअप नंबर आहे.