Agriculture News : बोगस खते, बियाणे विक्री करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार, नवीन कायद्याची निर्मिती होणार – फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture News : शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेती करत असताना बियाणे आणि खते हे व्यवस्थित असणे खूप गरजेचे असते. कारण जर बियाणेच उगवली नाही तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळे आता बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यासंदर्भातील कायदा तयार करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

चांगल्या क्वालिटीची खाते स्वस्तात खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

काल सोमवारपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशना दरम्यान बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बोगस बीबियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यासंदर्भात नवीन कायदा करणार असल्याची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी आपत्कालिन आराखडा देखील तयार करण्यात आला आहे, असे निवेदन देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही कृषी संबंधित गोष्टींची माहिती अगदी सोप्या पद्धतीने मिळवायची असेल तर आता टेन्शन घेऊ नका. लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा. यामध्ये तुम्हाला सरकारी योजना, बाजारभाव, रोजचा ताजा हवामान अंदाज, तसेच पशुंची खरेदी विक्री, रोपवाटिकांची माहिती, जमीन खरेदी विक्री, या सर्वांबाबत एकदम सोप्या पद्धतीने आणि मोफत माहिती मिळेल. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन आपले हे ॲप इंस्टॉल करा.

त्याचबरोबर पावसाळी पावसाळी अधिवेशन सुरू होताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत हे सरकार शेतकऱ्यांची गंभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोप केला होता. दरम्यान हा आरोप देखील फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. अस म्हणत फडणवीस यांनी आरोपी फेटाळले आहेत.

अन्नधान्य, बियाणांचा पुरवठा जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत आणणार

बनावट उत्पादनांद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकार अन्नधान्य बियाणांचा पुरवठा जीवनावश्यक वस्तू (महाराष्ट्र दुरुस्ती) कायद्यांतर्गत आणणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केली. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली.

अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यासंदर्भातील कायदा- फडणवीस

फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने रविवारी शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत आणण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यासंदर्भातील कायदा तयार करण्यात येत आहे.

80 टक्के पेरण्या पूर्ण- देवेंद्र फडणवीस

‘राज्यात विविध भागांत मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पुणे विभाग आणि नाशिक विभागातील काही भागात पेरणी झालेल्या क्षेत्राचे प्रमाण कमी आहे. पावसाने ओढ दिल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी आपत्कालिन आराखडा तयार करण्यात आला आहे’,असे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे – देवेंद्र फडणवीस

हवामान विभागाने येत्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. कालच यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाही त्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांनाही लवकरच मदत मिळेल, असे त्यांनी सांगितले. बीटी बियाण्यांप्रमाणेच इतर बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई राज्य शासन करेल. त्या अनुषंगाने विधिमंडळात कायदा आणला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

error: Content is protected !!