Agriculture News : कृषीमंत्रीपद मिळताच धनंजय मुंडे ऍक्शन मोडवर आले आहेत. “मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक सिंचन संच अशा योजनांमध्ये अर्ज करण्यात आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ द्यावा. तसेच योजनांमधील लॉटरी पद्धत बंद झाली पाहिजे अशा सुचना मुंडे यांनी दिल्या आहेत. कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारताच मुंडेंनी मंत्रालयात कृषी विभागाची आढावा बैठक घेतली होती त्यावेळी ते बोलत होते.
Online अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
त्यावेळी बैठकीत कृषी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा यासाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत. एक रुपया भरुन शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा विमा हप्ता राज्य सरकार भरणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता जास्तीत जास्त संख्येने अर्ज करावे, असे आवाहन मुंडे यांनी केले आहे. (Dhananjay Munde)
तसेच नमो शेतकरी महा सन्मान योजनेद्वारे सरकार शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्यात येणार आहे. खरीप हंगामापूर्वी तीन आणि रब्बी हंगामापूर्वी तीन हजार रुपये अशा दोन टप्प्यात देण्यासाठी प्रस्ताव तयार केला जावा, असे मुंडे म्हणाले आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना आगामी काळात होईल.
‘या’ ठिकाणी मिळेल सरकारी योजनांची माहिती
तुम्हाला जर अगदी सोप्या पद्धतीने सरकारी योजनांची माहिती मिळवायची असेल तर आत्ताच प्लेस्टोअरवर जा आणि Hello Krushi हे अँप इंस्टाल करा. यामध्ये तुम्हाला सरकारी योजनांची सविस्तर माहिती मिळेल. फक्त सरकारी योजनाच नाही तर बाजारभाव, हवामान अंदाज, जमीन मोजणी या सर्व गोष्टींची अगदी मोफत माहिती मिळेल.