Agriculture News : टोमॅटोचे वाढलेले दर सरकारच्या डोळ्यात खुपायला लागलेत, रविकांत तुपकरांचा सरकारवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture News : सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने शेतकरी लोकांमध्ये तर आनंद पाहायला मिळत आहे. मात्र शहरी लोकांचे बजेट चांगलेच कोलमडल्याचे दिसत आहे. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे शहरी भागात ओरड सुरु झाली असून सरकारने देखील भाव नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र सरकारने या हालचाली सुरु करताच त्याला कडाडून विरोध केला जात आहे. शेतकऱ्यांनी तसेच काही नेत्यांनी देखील याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत असतात. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कायम लढत असतात. सध्या देखील त्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. (Tomato Rate 🙂

रविकांत तुपकर म्हणाले, “जेव्हा टोमॅटोचे भाव पडून शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर होता, भरल्या शेतात ट्रॅक्टर फिरवत होता, जनावरे सोडत होता तेव्हा सरकारला जाग का आली नाही? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केला. त्याचबरोबर तेव्हा सरकारनं भाव वाढवण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत? असं देखील तुपकर म्हणाले आहेत.

टोमॅटो ही जीवनावश्यक गोष्ट नाही. त्यामुळे त्याचे भाव वाढले असले तरी जास्त आरडाओरडा करायची गरज नाही. शेतकऱ्यांनाही थोडा फायदा व्हावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. टोमॅटोचे वाढलेले दर सरकारच्या डोळ्यात खुपायला लागले आहेत. असं म्हणत रविकांत तुपकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

या ठिकाणी पाहा टोमॅटोचे बाजारभाव?

तुम्ही जर शेतकरी असला आणि तुम्हाला दररोजचा टोमॅटो किंवा इतर शेतीमालाचा बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर लगेचच प्लेस्टोअरवर जाऊन Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करा. या अँपचा फायदा असा की, यामध्ये तुम्ही दररोजचा बाजारभाव चेक करू शकता. त्याचबरोबर, सरकारी योजना, जमीन मोजणी, हवामान अंदाज आदींची माहिती तुम्हाला या अँपमध्ये मिळू शकते.

error: Content is protected !!