Agriculture Products : शेतकऱ्यांचा माल मॉलमध्ये विक्रीस ठेवणार – देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नवी मुंबई, ठाणे, वाशी या ठिकाणी मोठमोठे मॉल्स (Agriculture Products) आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपल्याकडे असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांना सवलतीच्या दरात स्टॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उत्पादनेही (Agriculture Products) ठेवण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे.

कराड येथील कृषी उत्पन्न्न बाजार समितीच्या (Agriculture Products) आवारात भरविण्यात आलेल्या 18 वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, रयत साखर कारखानाचे अध्यक्ष अ‍ॅड.उदयसिंह पाटील, शेती उत्पन्न बाजार समिती कराडचे सभापती विजय कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थिती होते.

बांबू लागवडीला प्रोत्साहन (Agriculture Products Sale In Mall)

या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन बदल, वैविध्यपूर्ण उपक्रम, नवनवीन तंत्रज्ञान यांची माहिती कराड बाजार समितीकडून उपलब्ध करून दिली जात आहे. या माध्यमातून काम करत असताना शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील ते मांडावेत सरकार निश्चितपणे ते सोडवेल. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या उत्पादित मालाला योग्य कृषी भाव देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कृषी विभागाला अधिक गतिमानता सरकार देत असून, शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी यंत्रणेला पाठविण्यात येत आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण देण्यात येत आहे. जेथे पाण्याची कमतरता आहे, तेथे बांबू लागवड केल्यास शाश्वत उत्पादन मिळू शकते. त्यासाठी जिल्ह्यात बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचेही पालकमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

‘शेतमाल विक्री व्यवस्था निर्माण व्हावी’

दरम्यान, आज शेतात माल पिकत आहे, पण विकायला जागा नाही ग्रामीण भागात जे उत्पादन होते ते गुणवत्तेच्या जोरावर शहरी बाजारपेठेत चांगल्या दराने विकले गेले पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण होणे आवश्यक असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी म्हटले आहे. तर “कराड येथे होत असलेले राज्यस्तरीय कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचा लाभ साधारणपणे आठ ते दहा लाख शेतकरी बांधव घेत असतात. कृषी उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न होत असतानाच खाद्यपदार्थांची गुणवत्ता, त्याचे पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि त्याचा टिकाऊपणा यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे.” असे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले आहे. या कार्यक्रमात कृषी उत्पादनात उत्तम कामगिरी करणार्‍या शेतकर्‍यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!