Agriculture Pump : मोबाईलद्वारे चालू-बंद करा तुमची शेतीची मोटर; संशोधकांनी बनवलंय ‘हे’ यंत्र!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी विजेचे सर्वाधिक (Agriculture Pump) झंझट असते. ऐन हंगामात तर लाईट अगदी पाच-पाच मिनिटाला जात असल्याची तक्रार शेतकरी करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याऐवजी स्टार्टरपर्यंत अनेकदा जावे लागते. मात्र, आता शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेऊन संशोधकांनी ‘सोलर आधारित फोरकास्टिंग यंत्र’ (Agriculture Pump) बनवले आहे.

या यंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपली शेतीची मोटर चालू-बंद करणे (Agriculture Pump) सहज शक्य होणार आहे. विशेष म्हणजे यात स्टार्टरपासून तुमचे अंतर कितीही असेल तरीही हे यंत्र प्रभावीपणे काम करते. थोडक्यात काय तर ऑटोचे हे पुढचे व्हर्जन आहे. कारण सध्या ऑटो चालू-बंद करायला शेतकऱ्यांना थेट स्टार्टरकडे जावे लागले. मात्र, हे यंत्र तुम्ही थेट मोबाईलवरून वापरू शकणार आहे.

अंतराची मर्यादा नाही (Agriculture Pump Researchers Made Device)

हरियाणा राज्यातील हिसार येथील गुरु जंभेश्वर विज्ञान आणि प्रौद्योगिकी विद्यापीठातील संशोधकांनी हे यंत्र बनवले असून, त्याचे त्यांना पेटंट देखील मिळाले आहे. संशोधकांच्या माहितीनुसार, हे यंत्र सोलर आधारित असून, ते शेतकऱ्यांना शेती पंप (Agriculture Pump) चालू किंवा बंद करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. हे यंत्र शेतकरी आपल्या मोबाईलवरून ऑपरेट करू शकणार आहे. यासाठी अंतराची कोणतीही मर्यादा नसून, ते कितीही अंतरवर काम करते. असे सांगितले जात आहे. विशेष करून हे यंत्र शेतकऱ्यांना वीज ये-जा करण्याच्या समस्येदरम्यान अत्यंत उपयोगी ठरणार आहे.

शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?

शेतकऱ्यांना ऐन हंगामात विद्युतवाहिनीवर लोड येऊन वीज ट्रिप होण्याची समस्या नेहमीच जाणवते. अशा वेळी शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र, तुमच्या स्टार्टरला हे यंत्र सूर्याची किरणे कायमस्वरूपी यंत्रावर पडतील असे कनेक्ट करावे लागणार आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलद्वारे हे यंत्र तुम्हाला मोटर चालू-बंद करण्यासाठी मदत करणार आहे.

विजेचा फॉल्ट असल्यास काय?

बऱ्याच शेतकऱ्यांना आता प्रश्न पडला असेल की आम्ही राहणार दूर शेतात दारे (बारे) धरायला. मग, आम्हाला लाईटचा काही फॉल्ट झाला असेल तर कसा समजणार? कारण तुम्ही मोबाईलवरून या यंत्राद्वारे मोटर चालू करत असाल. आणि डीपीवर दिवे गेले असेल. किंवा अगदी काहीही प्रॉब्लेम असेल. तर हे यंत्र तुम्हाला विजेचा फॉल्ट असल्याचा मेसेज पाठवते. त्यामुळे शेतकऱ्यांना अशावेळी देखील पुन्हा-पुन्हा विहिरीवर किंवा बोअरवेलकडे जाण्याची गरज पडणार नसल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या यंत्राद्वारे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्यास मदत होणार आहे.

error: Content is protected !!