Agriculture Quiz : देशात सर्वाधिक तांदूळ उत्पादन कोणत्या राज्यात होते? वाचा… सविस्तर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन (Agriculture Quiz) घेतले जाते. तांदूळ हे भारतीय लोकांच्या आहारातील प्रमुख धान्य असून, देशातील एकूण पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रापैकी एक चतुर्थांश क्षेत्रावर तांदूळ पिकाचे उत्पादन घेतले जाते. तर ऊस आणि मकाच्या शेतीनंतर धान हे जगातील तिसरे सर्वात मोठे उत्पादित होणारे पीक आहे. परिणामी, आता भारतातील कोणत्या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होते. कोणत्या राज्यातील शेतकरी सर्वाधिक धान पिकाची लागवड करतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण देशातील सर्वात मोठे तांदूळ उत्पादक (Agriculture Quiz) राज्य कोणते? याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक तांदूळ उत्पादन (Agriculture Quiz)

देशातील छत्तीसगड या राज्याला धानाची टोपली म्हटले जाते. मात्र, देशातील सर्वाधिक धानाचे उत्पादन हे पश्चिम बंगाल या राज्यात होते. पश्चिम बंगालमधील शेतकरी सर्वाधिक धान पिकाची लागवड करतात. देशातील एकूण तांदूळ उत्पादनापैकी पश्चिम बंगालमध्ये 13.62 टक्के तांदूळ उत्पादन (Agriculture Quiz) होते. परिणामी, इतर राज्यांच्या तुलनेत पश्चिम बंगालमधील शेतकरी सर्वाधिक धानाचे उत्पादन घेत आहेत.

डीएसआर तंत्रज्ञानाचा वापर वाढला

देशातील अनेक भागांमध्ये सध्या तांदळाच्या शेतीसाठी डीएसआर तंत्रज्ञानाच्या मदतीने, धानाची थेट पेरणी केली जात आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना रोपे तयार करून पुन्हा लागवड करण्याची गरज पडत नाही. तर थेट पेरणी केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होते. मागील काही वर्षांमध्ये या तंत्रज्ञानाने धानाची लागवड केली जात आहे. परिणामी, मजुरीवरील खर्च कमी झाला असून, शेतकऱ्यांना मोठी मदत झाली आहे.

तांदळाचे आहारातील फायदे

तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिट्यामिन बी, मॅगनीज, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि फायबर असते. हे सर्व तत्व शरीरासाठी खूप महत्वपूर्ण असतात. याशिवाय तांदळापासून बनवलेल्या खिचडीमध्ये तूप टाकून खाल्लयास, पचनास मदत होते. इतकेच नाही तर तांदळाच्या नियमित सेवनामुळे अनके आजार दूर ठेवण्यास मदत होते. पचनासाठी तांदूळ खूप सोपा असतो. हृदयाच्या आरोग्यासाठी तांदूळ उत्तम मानला जातो. तांदळाचा आहारात समावेश असेल तर माइग्रेनच्या समस्येपासून सुटका होते.

error: Content is protected !!