Agriculture Quiz : असे कोणते झाड आहे ज्याला केवळ महिनाभर फळ येते? बांधावर हमखास आढळते!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आजकाल शेतकऱ्यांच्या बांधावर एक झाड (Agriculture Quiz) हमखास पाहायला मिळते. विशेष म्हणजे मार्च ते मे तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये या झाडाला मोठ्या प्रमाणात फळे लगडलेली असतात. या झाडाला काही भागांमध्ये साखर चिंच, विलायती चिंच किंवा जिलेबीचे झाड म्हणून देखील ओळखले जाते. विलायती चिंच आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे? तिचे झाड भारतात कोणकोणत्या राज्यांमध्ये आढळते? या झाडाची वैशिष्ट्ये काय आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आज आपण विलायती चिंच (Agriculture Quiz) या झाडाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात (Agriculture Quiz Tree Bears Fruit Only For A Month)

विलायती चिंच हे झाड उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये (Agriculture Quiz) मोठ्या प्रमाणात बहरलेले पाहायला मिळते. विलायती चिंच खाण्यास अतिशय चविष्ट आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असते. तिच्यामध्ये अनेक पौष्टिक घटक असण्याने ती आरोग्यासाठी चांगली मानली गेली आहे. हे झाड सुमारे 10 ते 15 मीटर उंचीवर पोहोचते. विलायती चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. विलायती चिंच नियमित खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे या चिंचेला उत्तम प्रतिकारशक्ती असलेला ‘बूस्टर’ असेही म्हणतात. विलायती चिंचेबाबत अनेकांना माहिती नाही. तसेच माहिती अभावी अनेकांनी जणांनी हे फळ कधी खाल्लेले नसते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

अनेक शेतकऱ्यांचा गैरसमज असतो की, विलायती चिंच हे जंगली फळ आहे. मात्र, विलायती चिंच ही मधुमेहाचा आजार असणाऱ्या रुग्णांसाठी महत्वपूर्ण मानली गेली आहे. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी विलायती चिंच खाल्यास त्यांना बऱ्याच प्रमाणात इन्सुलिनच्या त्रासपासून सुटका मिळते. विलायती चिंचेच्या सालामध्ये प्रथिने, सॅपोनिन्स, टॅनिन, फ्लेव्होनॉइड्स आणि अल्कलॉइड्ससह फायटोकेमिकल्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे मानवी रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. विशेष म्हणजे विलायती चिंच या झाडाला वर्षातून केवळ एक महिनाभर फळ येते.

दुर्मिळ फळ म्हणून ओळख

विलायती चिंचेचे झाड ग्रामीण भागातील बाजारात हमखास पाहायला मिळते. विशेष म्हणजे बाजारात हे फळ सहजासहजी मिळत नाही. प्रामुख्याने गावातील मुले व वडीलधारी मंडळी हे फळ शहरात विकण्यासाठी आणतात. या झाडाला इंग्रजीत Manila Tamarind, Madras Thorn किंवा Monkeypod Tree असेही म्हणतात. सामान्यतः छत्तीसगड, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हे विलायती चिंचेचे झाड आढळते. त्यामुळे शेतकरी आपल्या, शेताच्या कडेला बांधावर किंवा माळरान जमिनीवर या झाडाचे जतन करू शकतात.

error: Content is protected !!