Agriculture Scheme : भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत ‘हा’ जिल्हा अव्वल; वाचा.. आकडेवारी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या संख्येने फळबाग शेतीकडे (Agriculture Scheme) वळत आहे. फळबाग शेती (Orchard farming) उभारण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन मिळावे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहे. यामध्ये फळबागेस बारमाही पाणी लागत असल्याने, शेतकऱ्यांसाठी शेततळे खोदण्यासाठी अनुदान योजना राबविली जाते. तर फळबाग लागवड करताना रोपे लागवडीपासून ते उत्पादन सुरु होईपर्यंत मोठा आर्थिक खर्च करावा लागतो. यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Agriculture Scheme) राबविली जाते. या योजनेचा सर्वाधिक लाभ घेण्याचा मान मिळवण्यात यंदा बुलढाणा जिल्हा अव्वल ठरला आहे.

42 टक्के निधी वितरीत (Agriculture Scheme Bhausaheb Fundkar Orchard Scheme)

राज्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन मिळावे. त्यातून राज्यातील फळबाग लागवडीखालील क्षेत्र वाढावे. यासाठी राज्य सरकारकडून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Agriculture Scheme) चालविली जाते. यामध्ये शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने पूर्ण 100 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते. यात प्रामुख्याने 2022-23 आणि 2023-24 या दोन वर्षांसाठी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना 42 टक्के निधी वितरीत करण्यात आला आहे. अशी माहिती कृषी विभागाकडून जारी करण्यात आली आहे.

जिल्हानिहाय फळबाग लागवड

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी (Agriculture Scheme) अर्ज केले होते. यामध्ये एकूण सोडतीतील अर्जांपैकी सर्वाधिक शेतकऱ्यांनी लाभ घेण्यामध्ये बुलढाणा जिल्हा अव्वल ठरला आहे. बुलढाणा जिल्ह्यात एकूण 1458 हेक्टरवर योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यानंतर नाशिक जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून, जिल्ह्यात 1287 हेक्टरवर योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असून, त्या ठिकाणी 1264 हेक्टरवर तर चौथ्या क्रमांकावर सांगली जिल्हा असून, त्या ठिकाणी योजनेच्या माध्यमातून 1260 हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे.

error: Content is protected !!