Agriculture Scheme : फळबाग शेतकऱ्यांसाठी सरकारची नवीन योजना; मिळणार तात्काळ अनुदान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विविध योजना (Agriculture Scheme) राबविल्या जातात. अशातच आता केंद्र सरकारने देशातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. ही योजना राष्ट्रीय सामूहिक विकास कार्यक्रमाअंतर्गत (क्लस्टर डेवलपमेंट प्रोग्रॅम) अंतर्गत सुरु करण्यात आली आहे. या योजनेमुळे देशातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. विशेष म्हणजे केंद्र केंद्र सरकारकाच्या फळबाग आणि हॉर्टिकल्चर विभागाकडून याबाबत एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म (Agriculture Scheme) सुरु करण्यात आला आहे. ज्यास ‘सीडीपी सुरक्षा’ असे नाव देण्यात आले आहे.

फळबाग लागवड वाढीस मदत होणार (Agriculture Scheme For Farmers)

‘सीडीपी सुरक्षा’ या केंद्र सरकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे (Agriculture Scheme) देशभरात फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वळवण्यास मदत होणार आहे. सध्याच्या घडीला देशातील एकूण कृषी उत्पादनात फळबाग उत्पादनाचा वाटा एक तृतीयांश इतका आहे. अलीकडे देशातील फळ पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ दिसून आली आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार, 2010-11 मध्ये फळबाग उत्पादनाची असलेली आकडेवारी 2400 लाख टनांहून वाढून 2020-21 मध्ये 3340 लाख टनांपर्यंत पोहचली आहे.

काय आहे सीडीपी-सुरक्षा?

सीडीपी-सुरक्षा हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म असून, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या फळबाग पिकांसाठी सहज आणि कमी वेळेत अनुदान मिळवू शकतात. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ई-रुपी व्हाउचरद्वारे फळबाग अनुदानाचे (Agriculture Scheme) पैसे दिले जातात. शेतकऱ्यांना फळबाग अनुदानाचे पैसे त्वरीत प्राप्त होतात. कारण हे पोर्टल एकाच वेळी पीएम किसान, एनआयसी, युआयडीएआय, ई-रुपी, जिओ टॅगिंग आणि जिओ फेन्सिंगशी जोडलेले आहे.

सीडीपी-सुरक्षा हा डिजिटल प्लॅटफॉर्म देशातील शेतकरी, दुकानदार, सामूहिक विकास संस्था आणि राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ यांना एकत्रीतपणे जोडून, शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यास मदत करते. हे सर्व काम ऑनलाइन व जलदगतीने होत असल्याने शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यात विलंब किंवा गैरसोय होत नाही. विशेष म्हणजे पडताळणीचे काम देखील वेगाने होते.

कसे मिळणार शेतकऱ्यांना अनुदान?

शेतकरी मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून या पोर्टलवर लॉग इन करू शकतात. या ठिकाणी शेतकऱ्यांना फळबाग अनुदानाशिवाय इतर अनेक सुविधांचा लाभ दिला जातो. एवढेच नाही तर शेतकरी या प्लॅटफॉर्मवर लॉग इन करून बियाणे, रोपवाटिका आणि रोपांची ऑर्डर देऊ शकतात. शेतकऱ्याने ऑर्डर दिल्यानंतर त्यांना पोर्टलवरच बियाणे किंवा रोपांसाठी पैसे द्यावे लागतात.

शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेनुसार अनुदानाची रक्कम पोर्टलवरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती केली जाते. यासाठी शेतकऱ्यांना जिओ टॅगिंगद्वारे त्यांच्या शेतातील लागवडीचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करावे लागतात. पोर्टलवर फोटो अपलोड होताच अनुदानाचे पैसे एआयद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. हे पैसे एकाच टप्प्यात शेतकऱ्यांना दिले जातात.

error: Content is protected !!