Agriculture Schemes : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी असा करा अर्ज; वाचा संपूर्ण माहिती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा (Agriculture Schemes) मोठा फायदा झाला आहे. दुष्काळी भागांमध्ये शेतकरी शेततळे उभारून फळपिकांची लागवड करत आहेत. या शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांना ठिबकच्या साहाय्याने बारमाही पिके घेणे शक्य होत आहे. आता तुम्हालाही सरकारच्या शेततळे योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राज्य सरकारच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी अर्ज कसा करायचा? शेततळ्यासाठीचे अनुदान कसे मिळवायचे? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? याबाबत (Agriculture Schemes) आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

किती मिळते अनुदान? (Agriculture Schemes ‘Magel Tyala Shettale’)

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी (Agriculture Schemes) कमाल मर्यादा 75 हजार रुपये इतकी आहे. शेततळ्याच्या आकारमानानुसार अनुदानाची ही रक्कम निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शेततळयाची मागणी करण्यासाठी अर्ज Online पध्दतीने सादर करावे लागतात. शेतकऱ्यांना शेततळे उभारणीसाठी 75 हजारपेक्षा जास्त खर्च झाल्यास, हा अतिरिक्त खर्च संबंधित लाभार्थ्यांनी स्वतः करणे अनिवार्य असते.

काय आहे पात्रता?

  • अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक.
  • अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्टया योग्य असणे आवश्यक.
  • अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • याशिवाय भात खाचरातील दोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता सरकारच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

आवश्यक कागदपत्रे

  • जमिनीचा 7/12 उतारा
  • जातीचे प्रमाणपत्र
  • आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला
  • दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला
  • आधारकार्ड
  • ८ – अ प्रमाणपत्र

कशी होते लाभार्थी निवड?

  • मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे घटकासाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून सोडतीनुसार लाभ मिळतो.

कसा कराल अर्ज?

तुम्हांलाही राज्य सरकारच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अॅप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमची नोंदणी करा. त्यानंतर या अॅॅपच्या माध्यमातून तुम्ही शेतीच्या सर्व योजनांचे खात्रीशीरपणे अर्ज करू शकतात. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे अनुदान मिळवण्यासाठी अॅपमध्ये जाऊन “सरकारी योजना” यावर क्लिक करा. ‘सरकारी योजना’ या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हांला स्वतःची नोंदणी करावी लागेल. हा अर्ज तुम्ही स्वतःच्या मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातूनही करु शकतात.

error: Content is protected !!