Agriculture Startups : शेती संबंधित स्टार्टअप बिझनेस सुरु करायचाय? सरकार देते 25 लाखांची मदत! वाचा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आजकाल शेतीमध्ये अधिक नफा मिळत असल्याचे पाहून अनेक नवशिक्षित तरुणांचा (Agriculture Startups) शेतीकडे ओढा वाढला आहे. यातील काही तरुण हे शेतीशी संबंधित स्टार्टअप बिझनेस सुरु करण्याचा विचार करत असतात. मात्र, याबाबतची माहिती नसल्याने आणि भांडवलाचा अभाव असल्याने तरुण कृषी संबंधित स्टार्टअप बिझनेस सुरु करण्यापासून वंचित राहतात. मात्र, अशा नवतरुणांसाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून कृषी संबंधित स्टार्टअप बिझनेस सुरु करण्यासाठी मदत केली जाते. त्यामुळे आज आपण कृषी संबंधित स्टार्टअप बिझनेस (Agriculture Startups) सुरु करण्यासाठी मदत कशी मिळवायची? याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

काय आहे योजना? (Agriculture Startups Government 25 Lakhs Help)

कृषी मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (RKVY) “नवकल्पना आणि कृषी-उद्योजकता विकास” कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाअंतर्गत देशातील नवतरुणांना शेतीशी संबंधित स्टार्टअप (Agriculture Startups) बिझनेस सुरु करण्यासाठी, देशात 24 RKVY ‘ऍग्री बिजनेस इनक्यूबेटर’ आणि 5 नॉलेज पार्टनर नियुक्त करण्यात आले आहे. ज्याद्वारे नवतरुणांना आपला बिझनेस सुरु करण्यासाठी मोठा फायदा होऊ शकतो.

किती मिळते आर्थिक मदत?

नवकल्पना आणि कृषी-उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत तरुणांना आपली नवकल्पना आणि कृषी संबंधित बिजनेस मॉडेल सादर केल्यास, पहिल्या टप्प्यात स्टार्टअप सुरु करण्यापूर्वी 5 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत कृषी मंत्रालयाकडून दिली जाते. त्यानंतर स्टार्टअप सुरु केल्यानंतर, कृषी आणि संबंधित क्षेत्रातील उद्योजक/स्टार्टअप्सना त्यांची उत्पादने, सेवा, व्यवसाय प्लॅटफॉर्म इत्यादी बाजारात आणण्यासाठी तसेच त्यांची उत्पादने वाढवण्यासाठी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत दुसऱ्या टप्प्यात कृषी मंत्रालयाकडून दिली जाते.

केवळ 20 स्टार्टअप्सची होते निवड

देशात 24 RKVY- ‘ऍग्री बिजनेस इनक्यूबेटर’ आणि 5 नॉलेज पार्टनर नियुक्त करण्यात आले आहे. त्यापैकी प्रत्येक नॉलेज पार्टनर आणि ‘ऍग्री बिजनेस इनक्यूबेटर’ कडून या योजनेअंतर्गत प्रत्येक श्रेणीमध्ये वर्षभरात जास्तीत जास्त 20 स्टार्टअप्सची निवड केली जाते. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या शिफारशींच्या आधारे निवडक स्टार्टअप्सना हप्त्यांमध्ये आर्थिक बजेट जारी केले जाते.

तरुणांना केले जातंय प्रशिक्षित

निवडीनंतर नवकल्पना आणि कृषी-उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत कृषी संबधित स्टार्टअप्सना (Agriculture Startups) सरकारच्या नॉलेज पार्टनर आणि RKVY ॲग्री बिझनेस इनक्यूबेटर्सद्वारे प्रशिक्षित केले जात आहे. याशिवाय आर्थिक, तांत्रिक, IP समस्या इत्यादींवर तांत्रिक सहाय्य आणि सल्ला देखील दिला जात आहे. याव्यतिरिक्त, केंद्र सरकारकडून कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी-स्टार्टअप कॉन्क्लेव्ह, कृषी मेळावे आणि प्रदर्शने, वेबिनार, कार्यशाळा इत्यादींसह विविध राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यांना विविध भागधारकांशी जोडून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम या प्रशिक्षणामार्फत केले जाते.

‘ऍग्री बिजनेस इनक्यूबेटर’ची उभारणी

नवकल्पना आणि कृषी-उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत राज्यांमधील नॉलेज पार्टनर आणि ‘ऍग्री बिजनेस इनक्यूबेटर’ना कृषी मंत्रालयाकडून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. या माध्यमातून 2019-20 ते 2023-24 यावर्षीपर्यंत जवळपास 1554 कृषी स्टार्टअप्सना दोन हप्त्यांमध्ये एकूण 111.57 कोटी रुपये वितरित करण्यात आले असल्याचे कृषी मंत्रालयाने म्हटले आहे. नव तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी ‘ऍग्री बिजनेस इनक्यूबेटर’ हे देशभरातील कृषी संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठांमध्ये उभारण्यात आले आहे. ज्या ठिकाणी संशोधकांकडून स्टार्टअप सुरु करण्यासाठी कार्यक्रम राबविले जातात. ज्यामुळे तुम्ही देखील एखादा कृषी संबंधित स्टार्टअप बिझनेस सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आपल्या जवळच्या कृषी संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठामध्ये याबाबत भेट देऊ शकता किंवा अन्य अधिकची माहिती मिळवू शकतात.

error: Content is protected !!