Agriculture Technology : भटक्या जनावरांचा हैदोस; अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवलंय भन्नाट उपकरण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकरी विविध पिकांचे (Agriculture Technology) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. मात्र, त्यांना भटक्या जनावरांपासून आपल्या पिकाचे संरक्षण करण्यात मोठी अडचण येते. अनेकदा भटकी जनावरे त्यांच्या पिकात वारंवार येऊन मोठे नुकसान करतात. अशा वेळी शेतकऱ्यांना सतत अशा जनावरांच्या मागावर राहावे लागते. मात्र, आता कृषी क्षेत्रातील तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह (एआय) आणि सौर ऊर्जा आधारित एक उपकरण (Agriculture Technology) तयार केले आहे. या उपकरणामुळे शेतकऱ्यांना भटक्या जनावरांपासून आपल्या पिकांचे संरक्षण करण्यात मदत होणार आहे. याशिवाय किडींवर नियंत्रण मिळवण्यात देखील यश मिळणार आहे.

राज्यपालांकडून शाबासकीची थाप (Agriculture Technology For Farmers)

लखनऊ विद्यापीठाच्या कॉम्पुटर सायन्स व बायोटेक्नॉलॉजी (Agriculture Technology) विभागाच्या विद्यार्थ्यांनी हे अत्याधुनिक यंत्र बनवले आहे. विशेष म्हणजे उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी देखील या उपकरणाबाबत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. इतकेच नाही तर या उपकरणाला भारतीय पेटेंट कार्यालयाकडून अधिकृतरित्या परवानगी देखील मिळाली आहे. हे उपकरण अल्ट्रासोनिक आणि इंफ्रा रेड तरंगांवर आधारित आहे. विशेष म्हणजे या उपकरणाच्या माध्यमातून जनावरांना कोणतीही इजा होत नाही. हे उपकरण प्रामुख्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि विविध सेन्सर्सच्या मदतीने तयार करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी लवकरच उपलब्ध होणार

आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह (एआय) आणि सौर ऊर्जा आधारित असलेल्या या उपकरणामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांमधुन जनावरांना सहजपणे हुसकावून लावता येणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना पिकांवरील पतंग किडी आणि अन्य किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर कमी करण्यास मदत होणार आहे. त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील कमी होणार आहे. लवकरच हे उपकरण देशभरातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून जाणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पीक संरक्षणासाठी मोठी मदत होणार आहे.

विशेष म्हणजे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सध्या हे उपकरण जुन्या खराब काम्पुटर, मोबाईल आणि अन्य मशीनरीच्या माध्यमातून तयार केले आहे. ज्यामुळे त्याच्या निर्मितीस फारसा खर्च आलेला नाही. मात्र, त्याला शेतकऱ्यांसाठी बाजारात उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची गरज असणार आहे. त्यामुळे या उपकरणामध्ये वापरल्या जाणाऱ्या अल्ट्रासोनिक, इंफ्रा रेड तरंग आणि सेन्सरच्या रेंजवर या उपकरणाची किंमत निर्धारित असणार आहे. असेही विद्यापीठाने म्हटले आहे.

error: Content is protected !!