Agriculture Technology : पिकावरील कीटकांमुळे त्रस्त झालाय; वापरा ‘हे’ कीटक सापळा यंत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेती पिके घेताना उडत्या कीटकांमुळे मोठे नुकसान (Agriculture Technology) सोसावे लागते. या उडत्या किडींमध्ये प्रामुख्याने नाकतोडा, पाकोळ्या आणि काही फळ माशांचा समावेश असतो. शेतकरी काही भागांमध्ये या किटकांना ‘पाकोळ्या’ या ग्रामीण नावाने देखील ओळखतात. विशेषतः टोमॅटो सारखे पीक घेताना तर या पाकोळ्यांचा शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो. शेतामध्ये कामगंध सापळे लावूनही शेतकऱ्यांना या किडींवर म्हणावे असे नियंत्रण मिळवता येत नाही. मात्र बाजारात सोलर उर्जेवर आधारित एक यंत्र उपलब्ध आहे. ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या कीटकांचा प्रभावी बंदोबस्त करता येऊ शकतो. ‘कीटक सापळा यंत्र’ असे या सौर ऊर्जा आधारित यंत्राचे नाव असून, आज आपण या यंत्राबद्दल जाऊन (Agriculture Technology) घेणार आहोत.

देशातील लाखो हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांकडून अनेकविध पिकांची लागवड केली जाते. मात्र काही उडते कीटक शेतकऱ्यांचे पूर्ण पीक फस्त करून टाकतात. कीटकनाशकांची फवारणी (Agriculture Technology) करायची म्हटले तरी तो पर्याय खूप खर्चिक असतो. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक खर्च करावा लागतो. मात्र शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन सौर उर्जेवर चालणारे ‘कीटक सापळा यंत्र’ विकसित केले गेले आहे. जे बाजारात उपलब्ध असून, शेतकरी या यंत्राचा वापर करत प्रभावीपणे आपल्या पिकातील कीटकांचा बंदोबस्त करू शकतात.

किंमत किती? (Agriculture Technology For Crops Affects Pests)

बाजारात उपलब्ध असलेल्या या कीटक सापळा यंत्राची किंमत 2500 ते 3000 रुपयांच्या आसपास असते. या यंत्राची विशेषतः म्हणजे ते स्वयंचलीत असून, संध्याकाळी 6 ते 7 वाजले की, ते आपोआप चालू होते. ते प्रकाशमान होत पिकांवर आपल्या मर्यादित क्षेत्रात लाईट प्रसारित करते. दर एका सेकंदाला या यंत्राच्या मदतीने 10 कीटक प्रकाशाकडे आकर्षित होत असल्याचे मशीन निर्मात्यांकडून सांगितले जाते. हे यंत्र मध्यरात्री 12 वाजेच्या आसपास स्वयंचलित चीपच्या माध्यमातून आपोआप बंदही होते.

कीटकनाशकांवरील खर्च कमी

दक्षिणकेडील राज्यांमध्ये धान, ऊस, डाळिंब, पेरू, नारळ, चहा, कॉफी आणि भाजीपाला पिकांवरील कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी या यंत्राचा प्रभावी वापर केला जात आहे. काही शेतकऱ्यांच्या वापरातून अशी माहिती समोर आली आहे की त्यांनी या कीटक सापळा यंत्राचा वापर केल्यानंतर त्यांचा कीटकनाशक फवारणीवरील खर्च निम्म्याने कमी झाला आहे. त्यामुळे तुम्हीही पिकांवरील कीटकांपासून त्रस्त असाल तर बाजारात उपलब्ध या यंत्राचा वापर करू शकतात. बाजारात वेगवेगळया प्रकारचे ‘कीटक सापळा यंत्र’ उपलब्ध आहेत. आपण यंत्राची संपूर्ण खात्री आणि माहिती घेऊनच खरेदी करावी. जेणेकरून आपल्याला कीटकांपासून प्रभावीपणे पिकांचे संरक्षण करता येईल.

error: Content is protected !!