Agriculture Technology : गवतावर तणनाशक वापरण्याची गरज नाही, दिवसभराचं काम फक्त 1 तासात करतंय ‘हे’ यंत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture Technology : पावसाळ्यात फळबागेत, तसेच बांधावर गवताची वाढ झपाट्याने होत असते. त्यामुळे अनेक शेतकरी हे गवत नष्ट करण्यासाठी रासायनिक तणनाशकाचा वापर करतात. फळबागेत तणनाशकाची फवारणी करताना ते तणनाशक पिकांवर व फळांवरही पडले जाते. त्यामुळे पानांवर व फळावर डाग पडतात. तसेच अनेक शेतकरी मजुर लावून ते गवत काढले जाते. या दोन्ही पद्धतीमध्ये शेतकऱ्याचा मोठा खर्च होतो. मात्र आज आपण असे एक यंत्र पाहणार आहोत की, ज्यामुळे तणनाशकाचा वापर करायची गरज पडणार नाही.

सर्वात कमी किंमतीत शेती उपकरणे कुठे मिळतील?

शेतकरी मित्रांनो आता शेती उपकरणे खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांचे स्वतःचे व्यासपीठ बनवण्यात आले आहे. शेती उपकरणे सर्वात कमी किंमतीत विकत घ्यायची असतील तर गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करा. येथे अनेक प्रकारचे भन्नाट उपकरणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Hello Krushi अँपवरून तुम्ही कमी किंमतीत शेतीउपयोगी उपकरणे सहज विकत घेऊ शकता. यासोबत जमीन मोजणी, सातबारा डाउनलोड करणे, रोजचे बाजारभाव चेक करणे आदी सेवा या अँपवर मोफत दिल्या जातात.

ही मशीन फोर स्ट्रोकची असून मशीनची किंमत साधारणतः १०००० रुपये इतकी आहे. ही मशीन पेट्रोलवर चालणारी असून तीन ते साडेतीन लिटर पेट्रोलमध्ये एका एकराचे गवत कापता येते. या मशीनला पेट्रोलसाठी एक व ऑईलसाठी एक असे दोन टँक आहेत. मशीनला बेल्ट असल्यामुळे हे मशीन पाठीवर अडकवून एक व्यक्ती हे मशीन चालवू शकते.

मशीनच्या पुढे गवत कापण्यासाठी नायलॉनची दोरी जोडलेली असते. मशीन चालू केल्यानंतर ही दोरी फिरते व या दोरीने गवत कापले जाते.
या मशीनचा वापर आपण बांधावरील गवत कापण्यासाठीही करू शकता. त्यामुळे रासायनिक तणनाशकाचा वापर न करता शेतकऱ्यांना फळबागेतील तसेच बांधावरील गवताचा कापता येते.

error: Content is protected !!