Agriculture Technology : ‘या’ राज्यात पाण्याचा ‘इस्राईल पॅटर्न’; शेतकऱ्यांना मिळतंय मोफत पाणी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतीमध्ये पाणी (Agriculture Technology) या घटकाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. शेतीसाठी पाणी नसेल तर पिकांच्या उत्पादनाबाबत कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. यंदा दुष्काळ पडला ज्यामुळे महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना पिके घेता आली नाही. भविष्यात पाण्याची समस्या मोठे विक्राळ रूप धारण करणार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पाण्याचा स्तर खालावला आहे. पूर्वी ज्या ठिकाणी ३०० फुटापर्यंत पाणी मिळत होते. त्याच ठिकाणी आज 1000 फुटापर्यंत बोअरवेल घेऊन सुद्धा शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. हीच बाब लक्षात घेऊन सध्या पंजाबमध्ये इस्राईल पॅटर्न राबविला जात आहे. शेतीतील ज्या प्रयोगासाठी इस्राईलला मास्टर (Agriculture Technology) मानले जाते. तोच प्रयोग सध्या पंजाबमध्ये शेतीसाठी केला जात आहे.

2200 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया (Agriculture Technology For Farmers)

पंजाब हे राज्य देशातील कृषी क्षेत्रातील आघाडीचे राज्य आहे. मात्र, पंजाबमध्ये सध्या पाणीटंचाई आणि जल प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे त्या ठिकाणी सध्या दररोज 2200 दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. यापूर्वी मोठ्या प्रमाणात सांडपाणी मोकाट सोडले जात होते. मात्र, सध्या जलशुद्धीकरणाच्या प्रगत सुविधांमुळे (Agriculture Technology) दररोज मोठ्या प्रमाणात सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. हे पाणी शेतीसाठी वापरले जात असून, इसाईली तंत्रज्ञानाचा वापर त्यासाठी केला जात आहे.

75 हजार बोअरवेल कोरडीठाक

पंजाबमधील सर्व 2200 एमएलडी प्रक्रिया केलेले सांडपाणी सिंचनासाठी वापरल्यास, 1.5 लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी मदत होणार आहे. जल संधारण, वीज बचत आणि भूगर्भातील जलस्रोतांचे संवर्धन (Agriculture Technology) याबाबत ही सर्वात मोठी उपलब्धी मानली जात आहे. पाणी पातळी खालावल्याने पंजाबमधील अनेक भागामध्ये 600 ते 700 फूट खोलवर असलेली 75 हजार बोअरवेल कोरडीठाक पडली आहे. अशावेळी या प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उपयोग करून शेतीमध्ये प्रगती साधली जाणार आहे. विशेष शेतकऱ्यांना हे प्रक्रिया केलेले पाणी मोफत मिळत आहे. शिवाय या पाण्यात अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे खतांची गरज कमी होते.

कधी काळी होता विरोध

याशिवाय सध्या बोअरवेल असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीत पाण्याची पातळी खालावल्याने त्यांचा पाण्यासाठीचा खर्चही वाचणार आहे. कधी काळी वाया जाणाऱ्या पाण्याच्या वापराबाबत शेतकरी विचार करत नव्हते. तसेच अशा सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांना शेतकरी विरोध करत होते. मात्र आता बोअरवेल बंद पडू लागल्याने शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केलेल्या पाण्याबातची परिस्थिती स्वीकारली आहे. सांडपाणी प्रकल्पामध्ये प्रक्रिया केल्यानंतर गावातील तलाव प्रकल्पांचे पाणी प्रक्रिया करून भूमिगत पाइपलाइनद्वारे शेतात पोहोचवले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.

error: Content is protected !!